शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Vijay Kedia Success Story : एकेकाळी मुलाच्या दुधासाठी नव्हते १४ रुपये, आता पत्नीला गिफ्ट केला मिल्क कंपनीचा हिस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 10:58 AM

1 / 11
कधीकधी आपल्या आयुष्यात इतक्या अडचणी येतात की आपण त्यात अडकून जातो. काही गोष्टी सातत्यानं घडत असतात आणि त्या थांबवणं आपल्या हातातही नसतं. काहीही झालं तरी त्या अडचणीतून स्वतःला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला अशीच एक यशाची कहाणी सांगत आहोत, जी परिस्थितीला हरवून जिंकली आहे.
2 / 11
ही गोष्ट एका अशा व्यक्तीची आहे, ज्याच्याकडे एकेकाळी आपल्या मुलासाठी दूध विकत घ्यायलाही पैसे नव्हते. मुलाला भूक लागली होती, पण दुधाचे पॅकेट विकत घेऊन मुलाला देण्यासाठी त्यांच्या खिशात १४ रुपये नव्हते. आज त्या व्यक्तीनं चक्क दुधाचीच कंपनी विकत घेतली आहे.
3 / 11
आपल्या समोर असलेल्या अडचणींना त्यांनी खंबीरपणे उभं राहून सामना केला. त्यांनी अडणींसमोर हार मानली नाही, तर ताकदीनं उभे राहिले. त्यांची मेहनत आणि चिकाटीमुळे आज ते ८०० कोटींचे मालक झाले आहेत. ही गोष्ट आहे स्टॉक ब्रोकर विजय केडिया यांची.
4 / 11
कोलकाता येथील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले विजय केडिया यांचे वडील स्टॉक ब्रोकर होते. पण विजय केडिया हे दहावीत असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या निधनाचा त्याला इतका धक्का बसला की तो दहावीच्या परीक्षेलाही बसू शकले नाहीत. परीक्षेत नापास झालेल्या विजय केडिया यांनी अभ्यास सोडला. त्याच्याकडे कमाईचं कोणतंही साधन नव्हतं. थोडीफार कमाई सुरू झाली, तर त्यानंतर त्यांच्या घरच्यांनी त्यांचं लग्न लावून दिलं.
5 / 11
पत्नी आणि मुलाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली. यानंतर त्यांनी शेअर बाजारात नशीब आजमावायचं ठरवलं, पण सुरुवातीला त्यांना त्यात फारसं यश मिळालं नाही. एक अशी वेळ होती तेव्हा एका खोलीत ६ लोक राहत होते. खर्च वाढत गेला आणि कमाई तशीच राहिली. घरखर्च चालवण्यासाठी त्यांना आईचे दागिने विकावे लागले. दुसरीकडे, त्यांना शेअर बाजारात पुन्हा पुन्हा तोटा सहन करावा लागत होता.
6 / 11
अशा परिस्थितीतून जात असलेल्या विजय केडिया यांच्याकडं आपल्या मुलाचं पोट भरण्यासाठी पुरेसे पैसेही नव्हते. एके दिवशी मूल भुकेनं रडत होतं. विजय यांच्या पत्नीनं त्यांना दुधाचं पॅकेट आणण्यास सांगितलं. त्यावेळी दुधाच्या पॅकेटची किंमत १४ रुपये होती, पण त्यांच्या खिशात तितकेही पैसे नव्हते.
7 / 11
ते आपल्या मुलाला रडताना पाहत होते. कसंबसं त्यांच्या पत्नीनं घरात ठेवलेली नाणी जमा केली आणि आपल्या मुलासाठी दूध आणलं. ही घटना विजय यांच्या मनात घर करून गेली होती. आपल्या परिस्थितीपुढे हार न मानता त्यांनी याचा सामना करण्याचा निर्णय घेतला. यानंतर ते कोलकाता सोडून मुंबईत आले.
8 / 11
मुंबईत आल्यानंतर विजय केडिया शेअर मार्केटसोबतच काम करू लागले. १९९२ मध्ये त्यांच्या नशिबाने कलाटणी घेतली. त्यावेळी शेअर बाजारात बुल रन आला. विजय केडिया यांना कमाईची जबरदस्त संधी मिळाली. हा त्यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. १९९२ च्या बुल रनमध्ये त्यांनी चांगली कमाई केली.
9 / 11
त्यांनी कोलकात्यात असताना पंजाब ट्रॅक्टर्सचे शेअर्स घेतले होते. ज्याची किंमत त्यावेळी ३५ रुपये होती. या शेअरची किंमत ५ पटीनं वाढली. एसीसीचे शेअर्स विकत घेण्यासाठी त्यांनी तो शेअर लगेच विकला. एसीसी सिमेंटच्या किमतीही वर्षभरात १० पट वाढल्या. यामुळे त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं.
10 / 11
त्यांनी मुंबईत घर घेतलं आणि कुटुंबाला कोलकात्याहून मुंबईला आणलं. शेअर बाजार अनिश्चिततेनं भरलेला आहे. अचानक मध्येच शेअर बाजार कोसळला आणि त्यांचे पैसे त्यात बुडाले. त्यांनी धीर सोडला नाही. २००२-२००३ मध्ये त्यांनी पुन्हा तीन कंपन्यांचे शेअर्स खरेदी केले आणि त्या कंपन्यांच्या शेअरनं त्यांना बपर नफा मिळवून दिला.
11 / 11
संधी मिळताच त्यांनी २००९ मध्ये एका दूध कंपनीचे शेअर्स खरेदी केले आणि ते आपल्या पत्नीला भेट म्हणून दिले. त्यांनी आपल्या पत्नीची माफीही मागितली. २०२२ मध्ये त्यांनी सियाराम मिल्क कंपनीचा १.१ टक्के हिस्सा विकत घेतला. आज विजय केडिया ८०० कोटींहून अधिक रुपयांचे मालक आहेत. शेअर बाजाराच्या बिग बुलमध्ये त्यांची गणना होते. त्यांनी स्वतःची कंपनी केडिया सिक्युरिटीज सुरू केली. त्याच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी शून्यातून आपलं जग निर्माण केलंय.
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकMumbaiमुंबई