Which are the 5 highest earning companies in the world
जगातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या ५ कंपन्या कोणत्या? जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 10:50 PM1 / 6जगात दरमिनिटाला सर्वाधिक कमाई करणाऱ्या कंपन्यांची यादी ब्लूमबर्कने जाहीर केली आहे. यात अनेक बड्या कंपन्यांचा समावेश आहे. ब्लूमबर्गने दिलेली कमाईची आकडेवारी ही डिसेंबरच्या डॉलरच्या रेटनुसार आहे. 2 / 6फेसबुक (Facebook) ही कंपनी दर मिनिटाला सर्वाधिक कमाई करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. फेसबुक दर मिनिटाला १ कोटी १० लाखांची कमाई करणारी कंपनी आहे. 3 / 6चौथ्या क्रमांकावर आहे सुप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट (Microsoft) कंपनी. ही कंपनी दर मिनिटाला २ कोटी ५ लाखांची कमाई करते. 4 / 6जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत Google तिसऱ्या क्रमांकावर आहे. गुगल दर मिनिटाला २ कोटी ५५ कोटी रुपयांची कमाई करतं. 5 / 6सर्वाधिक कमाई करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत अमेरिकेची जगप्रसिद्ध अॅपल (Apple) कंपनी दुसऱ्या क्रमांवर आहे. अॅपल कंपनी दर मिनिटाला ३ कोटी ५८ कोटी रुपयांची कमाई करते. 6 / 6जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या कंपन्यांमध्ये Amazon चा पहिला क्रमांक आहे. अॅमेझॉन कंपनी दर मिनिटाला तब्बल ५ कोटी ३३ लाखांची कमाई करते. आणखी वाचा Subscribe to Notifications