Women Investment Pattern: गुंतवणुकीसाठी महिला पतीकडून घेतात टिप्स, पण त्यांच्या मनातले कोण ओळखणार? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 09:28 AM2022-12-17T09:28:26+5:302022-12-17T09:40:19+5:30

आता महिला स्वत: निर्णय घेऊ लागल्या आहेत. कोविड-१९ साथीनंतर महिलांच्या गुंतवणुकीत मोठे बदल झाले आहेत.

गुंतवणुकीच्या बाबतीत पुरुषांच्या तुलनेत महिलांचे नियोजन पूर्णपणे वेगळे असते. विशेषत: कोविड-१९ साथीनंतर महिलांच्या गुंतवणुकीत मोठे बदल झाले आहेत. ‘डीएसपी विनव्हेस्टर पल्स २०२२’च्या आकडेवारीनुसार, आता महिला स्वत: निर्णय घेऊ लागल्या आहेत. मात्र, पुरुषांच्या तुलनेत त्यांची भागीदारी अजूनही कमी आहे.

६५ टक्के पुरुष स्वत: घेतात गुंतवणुकीचे निर्णय. ४४ टक्के महिला स्वत: घेतात गुंतवणुकीचे निर्णय. महिला पतीकडून घेतात वित्तीय सल्ला. पुरुष पित्याकडून घेतात वित्तीय सल्ला. गुंतवणूकदार पुरुष सल्लागारांना देतात प्राधान्य.

महिला सुरक्षा, स्थिरता व शिस्तीला देतात सर्वाधिक महत्त्व. पुरुषांना अधिक जोखीम घेणे आवडते. महिलांचा कल एफडी, पोस्टल डिपॉझिट, बॉण्ड यांच्याकडे. अधिकांश पुरुषांची स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंडास पसंती.

आर्थिक स्थिरतेला प्राधान्य. पुरुषांचे उच्च परतावा व निवृत्ती लाभांवर अधिक लक्ष. कर्जमुक्त जीवनास पुरुषांकडून प्राधान्य. महिलांचे मुलांच्या शिक्षणाला अधिक प्राधान्य. महिलांना नवे घर खरेदी करण्यात अधिक रुची.

पुरुष स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंडात लावतात अतिरिक्त रक्कम. नवीन तंत्रज्ञान, कर्ज फेडण्यास पुरुषांकडून प्राधान्य. महिलांना नवीन कपडे, घर सजविण्यात रस. फिरायला जाण्यावर खर्च होतो अतिरिक्त पैसा.

२१% पुरुष स्वत: समजून घेऊन करतात गुंतवणूक. पुरुषांना पहिला धडा मिळतो पित्याकडून. 

२१% महिला पतीकडून घेतात गुंतवणुकीचे धडे. मुलगा आणि मुलगी यांच्यात स्वतंत्र शिकवणुकीचा कल.