कामाची बातमी! कुठे टाकायचा पैसा? श्रीमंतांकडून शिका By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 09:12 AM 2024-12-01T09:12:18+5:30 2024-12-01T09:24:59+5:30
श्रीमंत आणि सामान्य लोक यांच्या गुंतवणुकीचे गणित वेगळे असते. सामान्य गुंतवणूकदार साधारणपणे एफडी, तसेच सुरक्षित गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करतात. श्रीमंत व्यक्ती मात्र गुंतवणुकीवर किमान १२ ते १५ टक्के वार्षिक रिटर्न देणारे पर्याय शोधतात. श्रीमंत लोक कुठे गुंतवणूक करतात हे जाणून घेऊ... ९३% तरुण बचत सातत्य टिकवून असून ते त्यांच्या मासिक उत्पन्नाच्या २० ते ३०% बचत करतात.
५८% भारतीय गुंतवणूकदार थेट शेअर बाजारातील शेअर्समध्ये गुंतवणूक करतात.
३९% तरुण म्युच्युअल फंड, तर २२% एफडीमध्ये गुंतवणूक करतात.
४५% तरुण इक्विटीला एफडी किंवा सोन्यासारख्या पारंपरिक गुंतवणूकचा पर्याया म्हणून पाहत आहेत.
भारतातील सुमारे ५५ टक्के श्रीमंत चांगल्या रिटर्नसाठी इक्विटीला प्राधान्य देत आहेत. ते निश्चित-उत्पन्न आणि खासगी इक्विटीसारखे पर्याय देखील निवडतात. तसेच ते पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस (पीएमएस), अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड (एआयएफ) आणि रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (रिट-इनव्हिट) यांत गुंतवणूक करत आहेत.
इक्विटी३९% , बॉण्ड्स, एफडी २०%, रिअल इस्टेट१९%
सोने१०%, लिक्विड फंड्स१२%,
सामान्य नागरिक कुठे पैसे गुंतवतात? - प्रॉपर्टी ५१.३%- सोने १५.२%
बँक डिपॉझिट १५.२%, इक्विटी १५.२%, इन्शुरन्स५.२%, पेन्शन फंड ५.७१%, रोख ३%