Bihar : Neighbor accused of killing goat police conduct postmortem
शेजारील व्यक्तीच्या बकरीजवळ गेला बकरा; मालकानं बेदम मारुन जीवच घेतला By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 4:17 PM1 / 10बिहारच्या कैमूर जिल्ह्यातून एक फारच धक्कादायक आणि विचित्र घटना समोर आली आहे. इथे एका बकऱ्याच्या मृत्यूची पोलीस चौकशी करत आहेत. बकऱ्याच्या मालकाचा आरोप आहे की, शेजाऱ्याच्या बकरीकडे त्याचा बकरा गेला होता. याचाच राग धरून शेजाऱ्याने बकऱ्याला काठीने मारून मारून त्याची हत्या केली. पोलिसांनी बकऱ्याच्या बॉडीचं पोस्टमार्टम केलं. 2 / 10चौरसिया गावात १५ जुलैला एका बकऱ्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी बकऱ्याची मालकीन राधा देवीचा आरोप आहे की, शेजाऱ्याने तिच्या बकऱ्याला काठीने मारून मारून हत्या केली. 3 / 10तिने पोलिसात तक्रार देत सांगितलं की, बकऱ्याचा गुन्हा केवळ इतका होता की, तो शेजाऱ्याच्या घरात बांधलेल्या बकरीला बघून तिच्याकडे गेला.4 / 10शेजारी सीपू रामला हे दिसलं तेव्हा त्याने बोकडावर हल्ला केला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. राधा देवीने शेजारी सीपूसोबतच त्याची आई आणि वडिलांविरोधातही तक्रार दिली. तेही बोकडाच्या हत्येत सहभागी असल्याचा तिने आरोप केला.5 / 10पोलीस स्टेशनमध्ये आलेली महिला रडत रडत न्यायाची मागणी करत होती. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बोकडाचं पोस्टमार्टम केलं. पीडितेने सांगितलं की, तिच्या बोकडाची किंमत जवळपास १५ हजार रूपये होती.6 / 10पशु चिकित्सकांनी सांगितलं की, एका बोकडाची बॉडी पोलिसांनी आणली होती. ज्याचं पोस्टमार्टम करण्यात आलं. रिपोर्ट यायला जरा वेळ लागेल, नंतर कळेल बोकडाचा मृत्यू कशामुळे झाला.7 / 10तेच घटनास्थळी पोहोचलेल्या एएसआयने सांगितलं की, बोकडाच्या मृत्यूचं प्रकरण पोलिसात आलं होतं. त्याची बॉडी पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आली होती. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर योग्य ती कारवाई केली जाईल.8 / 10कैमूर जिल्ह्यातील ही अशी काही पहिली घटना नाही. याआधीही काही प्राण्यांचे पोस्टमार्टम झाले आहेत. २ वर्षाआधी एका कोंबड्याला मारण्यासाठी ७ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळीही कोंबड्याचं पोस्टमार्टम करण्यात आलं होतं.9 / 10कैमूर जिल्ह्यातील ही अशी काही पहिली घटना नाही. याआधीही काही प्राण्यांचे पोस्टमार्टम झाले आहेत. २ वर्षाआधी एका कोंबड्याला मारण्यासाठी ७ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळीही कोंबड्याचं पोस्टमार्टम करण्यात आलं होतं.10 / 10कैमूर जिल्ह्यातील ही अशी काही पहिली घटना नाही. याआधीही काही प्राण्यांचे पोस्टमार्टम झाले आहेत. २ वर्षाआधी एका कोंबड्याला मारण्यासाठी ७ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळीही कोंबड्याचं पोस्टमार्टम करण्यात आलं होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications