शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पतीनं बाहेर केलं लफडं, रागात पत्नीनं केली सहापैकी पाच मुलांची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 3:40 PM

1 / 10
जितकी एखादी स्त्री आपल्या मुलांवर प्रेम करते तितकेच दुसरे कोणीही करत नाही. तसेच, कोणतीही स्त्री आपल्या पतीच्या प्रेमात विभागणी सुद्धा सहन करू शकत नाही, असेही म्हटले जाते. परंतु एका जर्मन महिलेने जे केले ते आश्चर्यचकित करणारे होते. मिररच्या रिपोर्टनुसार, जेव्हा तिच्या पतीचे प्रेम विभागले गेले तेव्हा त्या महिलेने तिच्या सहापैकी पाच मुलांचा जीव घेतला.
2 / 10
हे प्रकरण जर्मनमधील सोलिंगन शहरातील आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये येथे पाच मुलांचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला होता. मुलांच्या मृत्यूचा आरोप त्यांच्या आईवर होता. आरोपी आई क्रिस्टियनविरूद्ध वुपर्टलच्या जिल्हा न्यायालयात खटला चालू आहे.
3 / 10
क्रिस्टियनवर तिच्या पाच मुलांना ड्रग्सचा ओव्हर डोस दिल्याचा आणि नंतर त्यांना बाथरूममध्ये नेऊन निर्घृणपणे ठार मारल्याचा आरोप आहे. या प्रकरणात फिर्यादी असा दावा करतात की, क्रिस्टियनने आपल्या मुलांना त्यांच्या नाश्तामध्ये नशेचे पदार्थ दिले, जेणेकरून ते बेशुद्ध होतील. यानंतर आरोपी महिलेने मुलांना एक एक करून बाथरूममध्ये नेऊन त्यांना पाण्यात बुडवून ठार केले.
4 / 10
पाच मुलांमध्ये दोन ते तीन वर्ष वयोगटातील तीन मुली आणि सहा ते आठ वयोगटातील दोन मुले होती, त्यांचे मृतदेह 3 सप्टेंबर रोजी उत्तर राईन-वेस्टफेलिया येथील कौटुंबिक फ्लॅटमध्ये सापडले. या महिलेचे सहावे मूल, 11 वर्षीय मार्सल बचावले, कारण घटनेच्या वेळी ते शाळेत होते.
5 / 10
सरकारी वकिलांचे असे म्हणणे आहे की, मुलांची हत्या केल्यानंतर आरोपी महिलेने डसेलडोर्फ सेंट्रल स्टेशनवर रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, परंतु ती वाचली. दुसरीकडे क्रिस्टियनने आपला निर्दोषपणा कायम ठेवला आणि सांगितले की, मास्क घातलेला एक माणूस फ्लॅटमध्ये आला आणि त्याने मुलांना ठार मारले.
6 / 10
सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणातील तपासादरम्यान पोलीस अधिकाऱ्यांना असे कोणतेही पुरावे सापडले नाहीत, ज्यामुळे आरोपी महिलेने दिलेली विधाने खरी आहेत हे स्पष्ट होऊ शकेल.
7 / 10
फिर्यादी हेरिर्र्ट कौन गेभार्ड म्हणाले की, आरोपी महिला तिच्या पतीच्या नवीन मैत्रिणीशी वाद घालत होती. तो क्रिस्टियनचा तिसरा पति आहे, जो या सहापैकी चार मुलांचा पिता आहे. या कारणास्तव मुलांवर त्याचा राग काढून तिने त्यांची हत्या केली.
8 / 10
फिर्यादींनी क्रिस्टियनवर 'दुर्भावनायुक्त खून' केल्याचा आरोप केला आणि असे म्हटले की तिने निर्दोष मुलांच्या निर्दोषपणाचा फायदा घेतला.
9 / 10
या रिपोर्टनुसार गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पोलिसांना पाच मुलांच्या मृत्यूची माहिती मिळाली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा फ्लॅटमध्ये एक वर्षाची मेलिना, दोन वर्षांची लिओनी, तीन वर्षाची सोफी, सहा वर्षाची टिमो आणि आठ वर्षीय लुका यांचे मृतदेह सापडले.
10 / 10
पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पाच मुलांचे मृतदेह पलंगावर पडले होते. या प्रकरणातील चौकशीनंतर आरोपी महिलेला अटक करण्यात आली.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGermanyजर्मनीInternationalआंतरराष्ट्रीय