In 2018, the word 'Dhumalakal' in social media
'मागे वळून पाहताना' - 2018 मध्ये सोशल मीडियावर यांचा 'धुमाकूळ' By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 3:20 PM1 / 10Diet Sabya हे इंस्टाग्राम अकाऊंट असून याची चांगलीच चर्चा यंदा झाली होती. डाएटसंदर्भातील माहिती या अकाऊंटवरुन दिली जाते. 1 लाख 31 हजार फॉलोअर्स आहेत.2 / 10नेटफ्लिक्स या युट्यूब सर्व्हीसची सुरुवात 2016 मध्ये झाली. पण, सॅक्रेड गेम्समुळे यंदा नेटफ्लिक्सला मोठी प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे त्यांचा युजर्सबेस वाढला. 3 / 10या वर्षाच्या सुरुवातीला पद्मावत हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्यामुळे दीपिका पदुकोण इंटनेटवर अधिकच चर्चेत आली. तर, तिची फॅशन, तिचा लूक अन् रणवीरसिंग सोबतच्या लग्नामुळे ती यंदा लाईमलाईटमध्ये होती. 4 / 10बॉलिवूड अक्ट्रेस आणि विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माचा एक फोटो यंदा खूपच व्हायरल झाला होता. सुई-धागा चित्रपटातील या फोटोने इंटरनेटवर धुमाकूळ घातला.5 / 10एक आँख मारी अन् वो लडकी दुनिया मे फेमस हो गयी, अशीच सत्य घटना मॉडेल अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियर हिच्या बाबतीत घडली. एका गाण्यातील भूमिकेवेळी प्रियाने डोळा मारला अन् इंटरनेटवर तरुणाई घायाळ झाली. 6 / 10फुटबॉल टीम इंडियाचा कर्णधार सुनिल छेत्रीने भारतीयांना केलेलं अपील यंदा नेटीझन्सने डोक्यावर घेतलं. मुंबईतील फुटबॉल स्टेडियममध्ये केनियाविरुद्धचा सामना पाहण्याची विनंती सुनिलने केली होती.7 / 10बिहारचे माजी मंत्री लालूप्रसाद यादवांचे चिरंजीव तेज प्रताप यांच्या प्रतापाचीही दखल सोशल मीडियाने घेतली. श्रीकृष्णाच्या वेशात, भगवान शंकरच्या वेशातील त्यांचे फोटो व्हायरल झाले होते.8 / 10विराट कोहलीच्या एका ट्विटर हँडलवरुन करण्यात आलेलं ट्विट चांगलंच चर्चेत आलं होतं. ज्यांना भारतीय फलंदाज आवडत नाहीत, त्यांनी देश सोडून जावं, असे ट्विट कोहलीनं केलं होते. ते यंदा ट्रेडिंगमध्ये होते.9 / 10प्रिया प्रकाशनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसद सभागृहात मारलेला डोळा, इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला. तसेच मोदींनी दिलेली जादू की झप्पीचा फोटोही व्हायरल झाला.10 / 10डान्सिंग अंकल अन् चाय पी लो वाली वुमेन हेही यंदाच्या वर्षी सोशल मीडियाचे हिरो ठरले आहेत. या अंकलचा डान्स अन् वुमेनच्या डायलॉगने धुमाकूळ घातला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications