'दिल मिल गये'मधली डॉ. रिद्धिमा कुठे गायब झाली? ओळखूच येणार नाही असा झालाय लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 02:56 PM2024-12-10T14:56:51+5:302024-12-10T15:06:34+5:30

२०१५ मध्ये स्वत:च्या नावातच केला बदल, आता कशी दिसते रिद्धिमा?

90s मधील तरुणाईमध्ये तेव्हा अनेक मालिका गाजल्या होत्या. 'मिले जब हम तुम','प्यार की ये एक कहानी','दिल दोस्ती डान्स' आणि बऱ्याच काही. यातलीच एक होती 'दिल मिल गये'.

'दिल मिल गये' मालिकेत अरमान-रिद्धीमाची जोडी खूप गाजली होती. अभिनेत्री शिल्पा शिवानंदने रिद्धीमाची भूमिका साकारली होती. शिल्पा सध्या कुठे आहे माहितीये का? आता तिला ओळखणंही कठीण झालं आहे.

शिल्पा शिवानंदचा जन्म १० डिसेंबर १९८२ रोजी साऊथ आफ्रिकेत झाला. २०१५ मध्ये तिने तिच्या नावात बदल केला. ओहाना शिवानंद असे केले. कारण शिल्पा हे नाव खूप कॉमन होतं.

शिल्पाने मॉडेलिंगपासून करिअरला सुरुवात केली. ४० जाहिराती केल्या. ऐश्वर्या, अमिताभ बच्चन आणि आमिर खानसोबतही ती झळकली आहे. तसंच काही साऊथ सिनेमांमध्ये काम केलं आहे.

२००७ मध्ये तिने दिल मिल गये मध्ये भूमिका साकारली. तिला खूप लोकप्रियता मिळाली. मात्र २००८ मध्येच तिने मालिका सोडली आणि ती सिनेमांकडे वळली. तिच्या शो सोडण्याने मालिकेचा टीआरपी घसरला होता.

ओहानाने 'दीवाने हो गए','अलर्ट 24X7' या सिनेमांमध्ये काम केले आहे. २०१० मध्ये ती पुन्हा टीव्हीवर परतली. मात्र तिला फारसं यश मिळालं नाही.

२०१६ साली तिने 'ये है लॉलिपॉप' सिनेमात काम केलं. तो तिचा शेवटचा सिनेमा. सध्या ओहाना मुंबईतच राहते मात्र ती आता लाईमलाईटपासून दूर आहे. तिचा लूक पूर्णपणे बदलला आहे. तिला ओळखणंही कठीण झालं आहे.