700 वर्षे जुन्या शाही किल्ल्यात होणार कॅट-विकीचं लग्न? एका रात्रीचं भाडं ऐकून येईल भोवळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 05:08 PM2021-10-29T17:08:41+5:302021-10-29T17:23:38+5:30

Vicky Kausha व Katrina Kaif लग्न करणार अशी जोरदार चर्चा आहे. हे खरं असेल तर जोडप्याच्या लग्नस्थळाचं एक दिवसांच भाडं ऐकून तुमचे डोळे पांढरे होतील.

अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाची सध्या जोरात सुरू आहे. डिसेंबर महिन्यात दोघेही राजस्थानच्या शाही किल्ल्यात थाटामाटात लग्न करणार असल्याचे कळतेय.

विकी कौशल आणि कतरिना कैफ राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये लग्न करणार असून त्यासाठी बारवरा येथील सिक्स सेन्स फोर्टच्या व्यवस्थापकांशी बोलणी सुरू आहे, अशीही चर्चा आहे.अर्थात अद्याप या वृत्ताला कुणीही दुजोरा दिला नाही. पण हो, हे खरं असेल तर या सवाई माधोपूर किल्ल्याचं एक दिवसांच भाडं ऐकून तुमचे डोळे पांढरे होतील.

हा शाही किल्ला 700 वर्षे जुना आहे. पण आतून पाहाल तर त्याची भव्यता डोळे दिपवून टाकते. बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, या किल्ल्यात एक रात्र घालवायची तर सामान्य व्यक्तिला 77 हजार रूपयात बुकिंग करावं लागेल.

77 हजार फक्त भाडं आणि त्यात सर्व टॅक्स जोडले तर या शाही किल्ल्यातील एका रात्रीच्या मुक्कामासाठी तुम्हाला सुमारे 90 हजार रूपये मोजावे लागतील. अर्थात हे एका सामान्य रूमचं भाडं.

स्पेशल रूमबद्दल बोलायचं तर या किल्ल्यात एक राजा मानसिंग सूट आहे. यात मुक्काम करायचा म्हटला तर त्यासाठी 4.94 लाख रूपये मोजावे लागतील. टॅक्स जोडून ही रक्कम 5.8 लाख रूपयांच्या घरात जाईल. म्हणजेच काय कॅट व विकीने लग्नासाठी निवडलेल्या या ठिकाणी एक रात्र घालावायची म्हटल्यास सामान्य व्यक्तिला वर्षभराचा पगार द्यावा लागेल.

राजस्थान मधील रणथंबोर नॅशनल पार्कपासून अवघ्या 30 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या सवाई माधोपूर येथील या किल्ल्याचे नाव ‘सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा’ असे आहे.

सिक्स सेन्सेस फोर्ट बरवारा हा 14 व्या शतकातील किल्ला आहे, जो सिक्स सेन्स सेंच्युरी आणि वेलनेस स्पा मध्ये रूपांतरित करण्यात आला आहे. किल्ला एका भव्य राजवाड्याची अनुभूती देतो.

या किल्ल्याचे प्रांगण खूप मोठे आणि भव्य आहे. आत एक रॉयल स्पा आहे. यामध्ये अनेक मंदिरं आणि जुना वारसा देखील आहे.

Read in English