marathi celebrity aditi sarangdhar and suhas revandekar lovestory
Photos: रॉकी इतकाच हॅण्डसम आहे मालविकाचा रिअल लाइफ नवरा By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 09:30 AM2021-10-21T09:30:00+5:302021-10-21T09:30:00+5:30Join usJoin usNext Aditi sarangdhar : सुहासने आदितीला एका कॉफी शॉपमध्ये प्रपोज करत लग्नाची मागणी घातली होती. छोट्या पडद्यावर तुफान गाजत असलेली मालिका म्हणजे 'येऊ कशी तशी मी नांदायला'. या मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नलू मावशी, शकू मावशी, स्वीटू, ओम, चिन्या या सगळ्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत आहे. ओम आणि स्वीटूप्रमाणेच या मालिकेतील आणखी एक भूमिका गाजत आहे ती म्हणजे मालविकाची. ओमची बहीण असलेली मालविका ओम आणि स्वीटूला वेगळं करण्यासाठी प्रचंड कटकारस्थान रचत आहे. त्यामुळे तिची खलनायिकेची भूमिकाही लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत रॉकी हा मालविकाचा प्रियकर असल्याचं दाखवण्यात आलं आहे. मात्र, मालविका रॉकीसोबत नेमकं कधी लग्न करणार हा प्रश्न अनेकांना पडला आहे. विशेष म्हणजे रॉकीसोबत मालविकाचं लग्न कधी होईल हे अद्यापही गुलदस्त्यात असलं तरीदेखील खऱ्या आयुष्यात मालविकाचं लग्न झालं आहे हे फार कमी जणांना माहित आहे. मालविका भूमिका साकारणारी अभिनेत्री आदिती सारंगधर हिचं लग्न झालं असून तिला एक गोड लहान मुलगादेखील आहे. आदितीच्या नवऱ्याचं नाव सुहास रेवंडेकर असून २५ मे २०१३ मध्ये त्यांचं लग्न झाल्याचं सांगण्यात येतं. सुहासने आदितीला एका कॉफी शॉपमध्ये प्रपोज करत लग्नाची मागणी घातली होती. सुहास-आदितीला एक लहान मुलगा आहे. अरिन असं त्याचं नाव असून अनेकदा अदिती त्याच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनCelebrityTelevision