marathi celebrity aditi sarangdhar and suhas revandekar lovestory
Photos: रॉकी इतकाच हॅण्डसम आहे मालविकाचा रिअल लाइफ नवरा By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 9:30 AM1 / 10छोट्या पडद्यावर तुफान गाजत असलेली मालिका म्हणजे 'येऊ कशी तशी मी नांदायला'. या मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.2 / 10नलू मावशी, शकू मावशी, स्वीटू, ओम, चिन्या या सगळ्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत आहे.3 / 10ओम आणि स्वीटूप्रमाणेच या मालिकेतील आणखी एक भूमिका गाजत आहे ती म्हणजे मालविकाची.4 / 10ओमची बहीण असलेली मालविका ओम आणि स्वीटूला वेगळं करण्यासाठी प्रचंड कटकारस्थान रचत आहे. त्यामुळे तिची खलनायिकेची भूमिकाही लोकप्रिय ठरत आहे.5 / 10या मालिकेत रॉकी हा मालविकाचा प्रियकर असल्याचं दाखवण्यात आलं आहे. मात्र, मालविका रॉकीसोबत नेमकं कधी लग्न करणार हा प्रश्न अनेकांना पडला आहे.6 / 10विशेष म्हणजे रॉकीसोबत मालविकाचं लग्न कधी होईल हे अद्यापही गुलदस्त्यात असलं तरीदेखील खऱ्या आयुष्यात मालविकाचं लग्न झालं आहे हे फार कमी जणांना माहित आहे.7 / 10मालविका भूमिका साकारणारी अभिनेत्री आदिती सारंगधर हिचं लग्न झालं असून तिला एक गोड लहान मुलगादेखील आहे.8 / 10आदितीच्या नवऱ्याचं नाव सुहास रेवंडेकर असून २५ मे २०१३ मध्ये त्यांचं लग्न झाल्याचं सांगण्यात येतं.9 / 10सुहासने आदितीला एका कॉफी शॉपमध्ये प्रपोज करत लग्नाची मागणी घातली होती.10 / 10सुहास-आदितीला एक लहान मुलगा आहे. अरिन असं त्याचं नाव असून अनेकदा अदिती त्याच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आणखी वाचा Subscribe to Notifications