सुभेदारांच्या सोज्वळ सूनेचा ग्लॅमरस अंदाज; 'ठरलं तर मग' फेम जुई गडकरीचं नवं फोटोशूट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 12:00 PM2024-11-29T12:00:08+5:302024-11-29T12:06:12+5:30

स्टार प्रवाहवरील 'पुढचं पाऊल' या मालिकेत कल्याणीची भूमिका साकारून अभिनेत्री जुई गडकरीने प्रेक्षकांची मनं जिंकली.

सध्याच्या घडीला मराठी मालिकाविश्वातील आघाडीची नायिका म्हणून जुईकडे पाहिलं जातं.

आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने चाहत्यांना आपलंस केलं आहे.सोशल मीडियावरही अभिनेत्रीचा भलामोठा चाहतावर्ग आहे.

सध्या जुई 'ठरलं तर मग' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे.

शिवाय मालिकेतील तिची सायली सुभेदार नावाची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावते आहे.

नुकतेच जुई गडकरीने सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत.

आकाशी रंगाचा सुंदर ड्रेस त्यावर ऑक्साईड ज्वेलरी अशा लूकमध्ये अभिनेत्री पाहायला मिळतेय.

या फोटोंमध्ये जुईचं सौंदर्य खुललं आहे. 'आता होऊ द्या धिंगाणा सीझन-३' च्या आगामी एपिसोडमध्ये जुई पाहायला मिळणार आहे. त्यासाठी तिने हा लूक केला आहे.