गुलाबी साडी आणि लाली लाल लाल..! सोनाली कुलकर्णीचे साडीतले फोटो चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 06:44 PM2024-09-27T18:44:34+5:302024-09-27T18:56:39+5:30

Sonalee Kulkarni : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतेच गुलाबी साडीत फोटोशूट केले आहे.

मराठी कलाविश्वाची अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. उत्तम अभिनयाच्या जोरावर ती कायम चर्चेत येत असते.

अलिकडेच सोनालीने गुलाबी रंगाच्या साडीत फोटोशूट केलं. या फोटोशूटची नेटकऱ्यांमध्ये कमालीची चर्चा झाली.

सोनालीच्या साडीवर फ्लेमिंगो आणि फुलपाखरूचं वर्क केले आहे.

सोनाली कुलकर्णीने साडीवर केस मोकळे सोडले आहेत आणि गळ्यात नेकलेस घातला आहे.

सोनालीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळत आहे.

या फोटोंमध्ये सोनालीचा अंदाज खूपच बोल्ड आणि मोहक दिसतो आहे.

सोनालीने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे.

सोनालीने 'अंजिठा', 'पोस्टर गर्ल', 'झपाटलेला २', 'मितवा', 'क्लासमेट' यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.

सोनालीनं याचवर्षी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं, 'मलाइकोट्टई वालीबान' या चित्रपटाच्या निमित्ताने सोनाली पहिल्यांदाच मल्याळम चित्रपटसृष्टीत झळकली.

सध्या सोनाली होऊ दे चर्चा कार्यक्रम आहे घरचा या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे.