PHOTOS : सारा जमाना 'सोशल मीडिया' का दिवाना... पण 'हे' स्टार्स ट्विटर, इन्स्टापासून कोसो दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 01:14 PM2024-12-10T13:14:10+5:302024-12-10T13:32:58+5:30

असे कलाकार आहेत, जे या काळातही सोशल मीडियापासून बरेच लांब आहे. त्यांच्याबद्दलच आपण जाणून घेऊया...

सध्या सारा जमाना 'सोशल मीडिया' का दिवाना... असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इंडस्ट्रीतील बहुतेक सगळेच स्टार्स हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. पण, काही असेही कलाकार आहेत, जे इन्स्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकच्या जमान्यातसुद्धा सोशल मीडियापासून कोसो दूर आहेत.

बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखाने (Rekha) तिच्या प्रदीर्घ फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र त्या सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर आहेत. तरीही रेखा यांची फॅन फॉलोइंग खूप मजबूत आहे.

अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji) हिने गेल्या तीन दशकात आपल्या चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पण, तिने सोशल मीडियापासून दूर राहणे पसंत केले आहे.

बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक असलेला रणबीर कपूर (Ranbir Kapoor)कायम चर्चेत असतो. पण, त्याचे सोशल मीडियावर कोणतेही अधिकृत खाते नाही.

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानदेखील (Saif Ali Khan) कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करत नाही.

'दंगल' सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा आमिर खानदेखील सोशल मीडियापासून दूर आहे. तो शक्य होईल तितकं या गोष्टीपासून स्वतःला लांब ठेवतो.

महानायक अमिताभ बच्चन (Jaya Bachchan) हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. पण, याउलट त्यांच्या पत्नी व दिग्दज अभिनेत्री जया बच्चन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करत नाहीत.

'थाला' म्हणून ओळखला जाणारा साऊथ सुपरस्टार अजित कुमारनं (Ajith Kumar) तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलंय. तो कायम चर्चेतही असतो. पण, अजित कुमार हा सोशल मीडियाचा वापर करत नाही. तरीही त्यांच्या चाहत्यांची संख्या जबरदस्त आहे.

आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकणारा अभिनेता म्हणजे अक्षय खन्ना (Akshaye Khanna). एकाहून एक सरस सिनेमे देणारा हा अभिनेता कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करत नाही.

'पुष्पा' आणि 'पुष्पा 2' या दोन्ही सिनेमे प्रदर्शित झाल्यानंतर . नायक अल्लू अर्जुनपेक्षा चित्रपटात खलनायकाचे पात्र साकारणाऱ्या फहाद फासिलचं (Fahadh Faasil) जास्त कौतुक झालं. आपल्या अभिनयानं सर्वांची मने जिंकणारा हा अभिनेता इन्स्टाग्रामवर नाही. त्याचं एक फेसबुक अकाऊंट आहे. पण, त्याचाही तो जास्त वापर करत नाही. तो आपलं खाजगी आयुष्य लाईमलाईटपासून नेहमीच दूर ठेवतो.