हळद लागली! शोभिता धुलिपालाला लागली चैतन्यच्या नावाची हळद, समोर आले प्री वेडिंगचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 02:11 PM2024-11-29T14:11:10+5:302024-11-29T14:16:58+5:30

Naga Chaitanya And Shobhita Dhulipala : नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. दोघांच्या प्री वेडिंग रितीरिवाजांना सुरूवात झाली आहे.

साऊथचा सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य लवकरच अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधतो आहे. त्या दोघांच्या लग्नाच्या रितीरिवाजांना सुरूवात झाली आहे. आज २९ नोव्हेंबर रोजी या जोडप्यांच्या हळदीचा कार्यक्रम पार पडला आहे. या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाच्या हळदीच्या कार्यक्रम कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थित पार पडले.

हळदी समारंभात शोभिता हात जोडून बसलेली दिसत आहे आणि तिचे कुटुंबीय अभिनेत्रीवर पाणी ओतताना दिसत आहेत.

शोभिताने हळदीसाठी पिवळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. सोन्याच्या दागिन्यांसह अभिनेत्रीने तिचा लूक पूर्ण केला आहे. फोटोंमध्ये ती हळदीच्या रंगात रंगलेली दिसत आहे.

यावेळी ते दोघे ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत आहेत. नागा चैतन्यची होणारी पत्नी शोभिताने हळदी सेरेमनी आणि मंगलास्नानम रिवाजासाठी दोन आउटफिट परिधान केले होते.

हळदी समारंभ पूर्ण केल्यानंतर शोभिता धुलिपाला लाल रंगाच्या साडीत दिसली. ज्यासोबत तिने पूर्ण हाताचा ब्लाउज कॅरी केला आहे. फोटोमध्ये नागा चैतन्य पांढऱ्या कुर्त्यामध्ये दिसत आहे. जो आपल्या भावी वधूकडे पाहत होता.

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांची काही महिन्यांपूर्वीच एंगेजमेंट झाली होती. यादरम्यान दोघांनी एकमेकांसोबत खूप पोज दिल्या होत्या.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नागा चैतन्य आणि शोभिता ४ डिसेंबर रोजी हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये सात फेरे घेणार आहेत.