शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

४ महिन्याआधी लॉकडाऊनमध्ये अभिनेत्रीनं केलं तिसरं लग्न, आता पतीला मारझोड करत काढलं घराबाहेर....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 2:43 PM

1 / 10
साऊथची अभिनेत्री विनीता विजयकुमार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या अभिनेत्रीबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नाच्या ४ महिन्यातच विनीता विजयकुमारने पती पीटर पॉल याला मारझोड करून घरातून बाहेर काढलंय. आश्चर्याची बाब ही आहे की, पीटर पॉल आणि विनीता विजयकुमारने ४ महिन्यांआधी २७ जूनला लग्न केलं होतं.
2 / 10
जूनमध्ये दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पीटर पॉलसोबत विनीता विजयकुमारचं हे तिसरं लग्न होतं. याआधी विनीता विजयकुमारची २ लग्ने मोडली आहेत.
3 / 10
विनीता ही तीन मुलांची आई आहे. ज्यातील एक मुलगी तिच्यासोबतच राहते. त्यामुळे तिच्या तिसऱ्या लग्नावेळी चांगलाच गोंधळ झाला होता. अनेकांनी तिला पीटर पॉलसोबत लग्न न करण्याचा सल्ला दिला होता.
4 / 10
Bollywoodlife.com ने दिलेल्या वृत्तानुसार, याबाबत दिग्दर्शक रविंद्र चंद्रशेखर यांनी माहिती दिली. ही बातमी खरी असल्याचं सांगत रविंद्र चंद्रशेखरन पोस्टमध्ये लिहिलं की, 'सगळं खरंय. सगळं बोललं गेलेलं खरं आहे'.
5 / 10
मीडिया रिपोर्ट्नुसार, दोघांमध्ये वाद तेव्हा झाला जेव्हा विनीता मुलगी आणि पती पीटर पॉलसोबत गोव्याला फिरायला गेले होते. लग्नानंतरही ही त्यांची पहिली ट्रिप होती आणि पीटर पॉलने जास्त दारू प्यायली होती.
6 / 10
दारूवरून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि वेळ मारझोडीवर आली. इतकेच काय तर चेन्नईला परतल्यावरही पीटरचं पीणं कमी झालं नाही. दोघांमध्ये पुन्हा भांडण झालं. त्यानंतर विनीताने पतीला मारझोड करून घराबाहेर काढलं.
7 / 10
पीटर पॉलचंही विनीतासोबतचं हे दुसरं लग्न आहे. ज्या दिवशी विनीता विजयकुमारर आणि पीटरचं लग्न झालं त्याच दिवशी पीटरच्या पहिल्या पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली होती.
8 / 10
पीटरची पहिली पत्नी एलिझाबेथने दावा केला होता की, पीटरसोबत तिचा अजून घटस्फोट झालेला नाही. अशात हे लग्न कायदेशीररित्या रद्द करावं. नंतर बातमी आली होती की, पीटर पॉल आणि विनीता विजयकुमारने हा वाद सोडवला आहे.
9 / 10

10 / 10

टॅग्स :TollywoodTollywoodmarriageलग्न