शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Wedding of K.LRahul and Athiyaa: शुभ मंगल सावधान... लग्नानंतर केएल राहुलचे प्रेमाचे बोल, लग्नबंधनाचे फोटोही आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 8:50 PM

1 / 10
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी अथिया शेट्टी आणि भारताचा आघाडीचा क्रिकेटफलंदाज के. एल. राहुल यांचा आज लग्नसोहळा पार पडला. राहुल-आथियाचं शुभ मंगल सावधान झालं.
2 / 10
दोघांनीही एकमेकांचा आयुष्यभरासाठी जोडीदार म्हणून स्वीकार केला. सुनील शेट्टीच्या खंडाळा इथल्या आलिशान फार्महाऊसमध्ये या दोघांचा लग्नसोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला दोघांचे नातेवाईक आणि मोजक्याच मित्रमंडळींना निमंत्रित केलं होतं.
3 / 10
गेल्या तीन दिवसांपासून अथिया आणि राहुल यांच्या विवाहसोहळ्याचं विधीव्रत आणि कार्यक्रम सुरू होते. अथिया आणि राहुल यांचं लग्न झाल्यानंतर काही विधी आटोपल्यानंतर मीडियासमोर येणार आहेत.
4 / 10
अथिया आणि राहुल यांच्या लग्न सोहळ्याला अनुपम खेर,इशांत शर्मा, अंशुला कपूर, कृष्णा श्रॉफ हे सहभागी झाले होते. विवाहसोहळ्यात सहभागी झालेल्या निमंत्रितांना तिथले फोटो सोशल मीडियावर पोस्ट न करण्याची विनंती केली होती.
5 / 10
मीडियाला या सोहळ्यापासून दूर ठेवण्यात आलं होतं. त्यामुळेच, लग्नानंतर काही वेळातच अथिया आणि के.एल. राहुल यांनीच स्वत:च्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. तसेच, पत्नीपद्दल प्रेमाचे शब्दही लिहिले आहेत.
6 / 10
'तुझ्या प्रकाशात, मी प्रेम कसे करावे हे शिकतो...' असे कॅप्शन राहुलने दिले आहे. आज, आमच्या सर्वात प्रियजनांसोबत, आम्ही त्या घरात लग्न केले ज्याने आम्हाला खूप आनंद आणि शांतता दिली. कृतज्ञता आणि प्रेमाने भरलेल्या अंतःकरणाने, आम्ही या एकत्रतेच्या प्रवासात तुमचे आशीर्वाद मागतो, अशी भावना राहुलने लग्नानंतर व्यक्त केली आहे.
7 / 10
अथिया आणि राहुलचं लग्न झाल्यानंतर सुनील शेट्टीने मुलगा अहानसह बंगल्याच्या बाहेर येऊन तिथं असलेल्या मीडियाच्या प्रतिनिधींना मिठाईचं वाटप केलं. त्यावेळी सुनीलवर सर्वांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
8 / 10
दरम्यान, या सोहळ्याच्या निमंत्रितांचा अस्सल दाक्षिणात्य पद्धतीनं पाहुणचार करण्यात आला. निमंत्रितांना केळीच्या पानावर जेवण वाढण्यात आलं होतं.
9 / 10
गेल्या अनेक महिन्यांपासून अथिया आणि राहुल यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. परंतु दोघांनी अथवा त्यांच्या घरच्यांनी याबाबत कोणतीही माहिती अधिकृतपणं दिली नाही.
10 / 10
दरम्यान, लग्नानंतर दोन्ही कुटुंबातर्फे मुंबईत ग्रँड रिसेप्शनचं आयोजन केलं जाणार आहे. त्या रिसेप्शनला सुमारे तीन हजार पाहुणे निमंत्रित केले जाणार आहेत.
टॅग्स :K. L. Rahulलोकेश राहुलSunil Shettyसुनील शेट्टीbollywoodबॉलिवूड