Who were you, what happened to you! Jayadi's Aka Purva Shinde stunning look in 'Lagir Jala Ji'
कोण होतीस तू, काय झालीस तू! 'लागिर झालं जी'मधील जयडीचा स्टनिंग लूक By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 04:51 PM2024-11-30T16:51:23+5:302024-11-30T16:54:55+5:30Join usJoin usNext Purva Shinde : पूर्वा शिंदे टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका लागिर झालं जीला कमी कालावधीत चांगला प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेऊन बराच काळ उलटला आहे. मात्र तरीदेखील या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहेत. अभिनेत्री पूर्वा शिंदे हिने या मालिकेत जयडीची भूमिका साकारली होती. सध्या ती पारू मालिकेत काम करताना दिसत आहे. पूर्वा शिंदे सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. पूर्वा शिंदे सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. या फोटोतून तिच्यात खूप बदल झाल्याचे पाहायला मिळते. पूर्वा शिंदे दिवसेंदिवस ग्लॅमरस दिसते आहे. पूर्वा शिंदेनं नुकताच मेकओव्हर केला आहे. तिने शेअर केलेल्या फोटोत तिने केसांना ग्लोबल कलर आणि कर्ल्स केलेले पाहायला मिळत आहे. पूर्वा शिंदेमध्ये कमालीचा बदल झालेला पाहायला मिळत आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.टॅग्स :पूर्वा शिंदेpurva shinde