7 health benefits of plums or aalobukhar
आंबट-गोड आलुबुखाराचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 04:12 PM2019-09-18T16:12:33+5:302019-09-18T16:42:33+5:30Join usJoin usNext Plum म्हणजेच, आलुबुखार ते फळ आहे. ज्यामध्ये शरीराला आवश्यक असणारी सर्व पोषक तत्व असतात. हे फळ उन्हाळ्यामध्ये येतं. याचं सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात आणि त्वचेच्या आजारांपासून सुटका मिळते. याची चव आंबट-गोड असते. यांमध्ये मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स योग्य प्रमाणात असतात. तसेच यामध्ये डायट्री फायबर सार्बिटॉल आणि आयसेटिनव्यतिरिक्त अॅन्टी-ऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. (Image Credit : Vaya.in)डोळ्यांसाठी फायदेशीर व्हिटॅमिन-के, सी आणि बी-6 मुबलक प्रमाणात असलेलं आलुबुखार डोळे आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असतं. याचं सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.वजन कमी करण्यासाठी आलुबुखारमध्ये दुसऱ्या फळांच्या तुलनेमध्ये कॅलरी फार कमी असतात. यामुळे याचं सेवन केल्याने वाढणार वजन नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते. ट्यूमर रोखण्यासाठी आलुबुखारची साल ब्रेस्ट कॅन्सर रोखण्यासाठी मदत करते. तसेच कॅन्सर आणि ट्यूमरचे सेल्स वाढविण्यापासून रोखतात. हाडं मजबुत करण्यासाठी मासिक पाळीनंतर महिलांनी आलुबुखारचं सेवन करणं आवश्यक आहे. यामुळे ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी होतो. हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी आलुबुखार खाल्याने ब्लड प्रेशर आणि हृदयसंबंधातील आजार होण्याचा धोका कमी होतो. त्याचबरोबर याच्या सेवनाने अल्जायमरचा धोकाही कमी होतो. बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आलुबुखारच्या सेवनाने बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं. यामध्ये असणारं आयर्न इम्यूनिटी सिस्टम मजबुत करण्यासाठी मदत करतं. याव्यतिरिक्त पोटॅशिअम शरीरातील पेशी स्ट्रॉन्ग करतं आणि ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये ठेवतं. मेंदूचं आरोग्य राखण्यासाठी आलुबुखारमध्ये असलेले अॅन्टीऑक्सिडंट त्वचेसोबतच मेंदूचं आरोग्य राखण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी मदत करतात. (टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.) (Image Credit : MomJunction)टॅग्स :पौष्टिक आहारहेल्थ टिप्सआरोग्यHealthy Diet PlanHealth TipsHealth