शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

टॉमेटो आइस्क्रीम खाल्लीत का कधी? पाहा आइस्क्रीमचे हे भन्नाट प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2018 7:05 PM

1 / 11
जगात खूप कमी व्यक्ती असतील ज्यांना आइस्क्रीम आवडत नाही. पण तुम्हाला आइस्क्रीमचे किती प्रकार माहीत आहेत? व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, चॉकलेट असे प्रकार तुम्ही खाल्लेच असतील. पण कधी लसूण आइस्क्रीम किंवा काकडी आइस्क्रीम खाल्लय का? असेच काही आइस्क्रीमचे भन्नाट प्रकार आपण पाहणार आहोत.
2 / 11
१) मशरूम आइस्क्रीम – हे आइस्क्रीम बनवताना फ्लेवरसाठी त्यात मशरूमची पावडर किंवा मशरूमचा चुरा टाकण्यात येतो.
3 / 11
२) पालक आइस्क्रीम – लहान मुलांना आइस्क्रीमसोबत पालकही खाता यावा यासाठी पालक आइस्क्रीमचा फ्लेवर तयार करण्यात आला.
4 / 11
३) टॉमेटो आइस्क्रीम – टॉमेटोचे बारिक तुकडे करून त्यात आइस्क्रीम मिश्रित केलं जातं.
5 / 11
४) फ्रेंच टोस्ट आइस्क्रीम – टोस्ट केलेल्या ब्रेडच्या पुडिंगमध्ये आइस्क्रीमचं मिश्रण केलं जातं. म्हणूनच या आइस्क्रीमला फ्रेंच टोस्ट आइस्क्रीम म्हटलं जातं.
6 / 11
५) मोहरी आइस्क्रीम – आइस्क्रीममध्ये मोहरीचा फ्लेवर टाकून किंवा मोहरीचे दाणे मिश्रित करून आइस्क्रीम बनवलं जातं.
7 / 11
६) लसूण आइस्क्रीम – व्हॅनिला आइस्क्रीममध्ये मध, लसणाची पेस्ट टाकून हा आइस्क्रीम बनवलं जातं.
8 / 11
७) काकडी आइस्क्रीम – काकडीच्या कापांचा अर्क किंवा तुकडे या आइस्क्रीमला वेगळीच चव आणतात.
9 / 11
८) मका आइस्क्रीम – मक्याचा अर्क, मध यांच्या मिश्रणामुळे आइस्क्रीम खूप गोड लागतं.
10 / 11
९) गाजर आइस्क्रीम – गाजराचा ज्यूस आइस्क्रीममध्ये टाकला जातो. त्यामुळे आइस्क्रीमला लाल रंग येतो.
11 / 11
१०) काळी मिरी आइस्क्रीम - काळी मिरीची पूड या आइस्क्रीममध्ये असल्याने हे आईस्क्रिम तिखट लागतं.
टॅग्स :foodअन्नHealthआरोग्यInternationalआंतरराष्ट्रीय