indias 5 city offering best street food
खाण्याचे शौकीन आहात तर मग देशातील 'या' पाच खाऊ गल्लींना नक्की भेट द्या By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2018 5:21 PM1 / 6काही जण जगण्यासाठी खातात तर काही खाण्यासाठी जगतात. त्यामुळेच देशात अशी अनेक ठिकाणं आहेत जी खाण्यासाठी अत्यंत प्रसिद्ध आहेत. तुम्हालाही जर खाण्याची प्रचंड आवड असेल तर देशातल्या 'या' पाच खाऊ गल्लींना नक्की भेट द्या.2 / 6चटोरी गल्ली, जयपूर - राजस्थान जसं कला आणि संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. त्याप्रमाणेच ते विभिन्न खाद्यपदार्थांसाठीही प्रसिद्ध आहे. संपूर्ण देशामध्ये जयपूरमधील चटोरी गल्ली ही खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्य़ासाठी प्रसिद्ध आहे. पाणीपूरी, दहीवडा, छोले भटुरे, टिक्की छोले, फालूदा तसेच विविध प्रकारची पेयं ही चटोरी गल्लीची खासियत आहे. 3 / 6खाऊ गल्ली, मुंबई (घाटकोपर) - स्वप्न नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये अनेक ठिकाणी खाऊ गल्ल्या आहेत. मात्र घाटकोपर यामधील खाऊ गल्ली ही सर्वात खास आणि प्रसिद्ध आहे. येथे पाणीपूरी, सँडविच, मसाला कोल्ड ड्रिंक्स, पावभाजी आणि टिक्का असे विविध पदार्थ मिळतात. यासोबतच चीज बस्ट डोसा आणि आईस्क्रीम डोसासारखे अनेक प्रकारचे डोसेही मिळतात. 4 / 6भुक्खड गल्ली, अहमदाबाद - अहमदाबादमधील भुक्खड गल्ली ही खाद्यपदार्थांसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. त्यामुळेच दररोज संध्याकाळी 7 नंतर येथे खवय्यांची रेलचेल असते. भुक्खड गल्लीत मॅक्सिकन, चायनीज, स्पॅनिश आणि लॅबनीज पदार्थ हे इंडियन स्टाइलमध्ये योग्य किंमतीत मिळतात. तसेच येथील वन स्लाइज पिझ्झा, तंदूरी मोमोज, फजीता राइस आणि फलाफल खुप प्रसिध्द आहे.5 / 6कचोरी गल्ली, वाराणसी - वाराणसीतील कचोरी गल्ली देखील खाद्यपदार्थांपैकी काही खास पदार्थांसाठी प्रसिध्द आहे. येथे कचोरी, जलेबीच्या दुकानांची संख्या अधिक आहे. या ठिकाणाचे नाव पहिले कूचा अजायब असे होते. मात्र खाण्यापिण्याचे अनेक चविष्ट पदार्थ विकले जाऊ लागल्यामुळे या ठिकाणाला कचोरी गल्ली असे नाव पडले. 6 / 6पराठ्यांची गल्ली, दिल्ली - दिल्लीतील पराठ्यांची गल्ली ही जगभरात प्रसिध्द आहे. येथे जवळपास 35 प्रकारचे पराठे मिळतात. जे तव्यावर कमी आणि कढईमध्ये जास्त बनवले जातात. बटाटे, मटार, टोमॅटो, कांदा, लसुण, पनीर यांसारख्या पराठ्यांचा समावेश असतो. तसेच शुध्द देशी तुपात हे सर्व पराठे सर्व्ह केले जातात. या पराठ्यांसोबत बटाट्याची भाजी, लस्सीही दिली जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications