Know the benefits of drinking green chilli water myb
शरीराला एक नाही तर अनेक गंभीर रोगांपासून दूर ठेवेल मिरचीचं पाणी, वाचा कसं... By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 5:15 PM1 / 10सगळ्याच भारतीयांच्या आहारात हिरवी मिरची महत्वपूर्ण आहे. याशिवाय भारतीय लोकांचं जेवण पूर्ण होत नाही. डाळीला फोडणी देण्यासाठी, पदार्थाला तिखट चव येण्यासाठी, कधी चटणीसाठी तर कधी तोंडी लावण्यासाठी मिरचीचा वापर सगळ्यांचाच आहारात केला जातो. मिरचीच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत. 2 / 10तुम्हाला कल्पनाही नसेल पण अनेक गंभीर आजारांपासून वाचवण्यासाठी आहारात मिरचीचा समावेश केला जातो, पण अनेकांना जास्त तिखट चव आवडत नसल्यामुळे मिरची खाण्याचा कंटाळा येतो. आज आम्ही तुम्हाला मिरचीच्या पाण्याचे सेवन केल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात याबाबत सांगणार आहोत. 3 / 10हिरव्या मिरचीत अनेक एंटीऑक्सीडंट्स असतात. व्हिटामीन ए, बी६, आर्यन आणि कॉपर तसंच पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणावर असतात. त्यात कॅरोटीन, क्रिप्टोक्सान्खिन, लुटेनसारखे पोषक तत्व असतात. 4 / 10पोट साफ होण्यास त्रास होत असले तर मिरचीच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन चांगल्या प्रकारे होते.5 / 10हिरव्या मिरचीत असणाऱ्या Capsaicin नावाच्या घटकामुळे प्रोस्ट्रेट कॅन्सरचा धोका कमी होतो. त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. 6 / 10अर्थरायटीस च्या पेशंट्सनी हिरवी मिरची जरूर खावी. ज्यांना अंगदुखीचा त्रास होत असेल त्यांनी देखील हिरव्या मिरच्या घातलेले पदार्थ खावेत. शरीरास आराम मिळतो.7 / 10 हिरवी मिरची रक्तातील गुठळ्या दूर करते. ह्या रक्ताच्या गुठळ्यांमुळे होणाऱ्या हृदरोगांमध्ये देखील मिरची गुणकारी ठरते. मिरची मध्ये असलेले व्हिटॅमिन सी आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. हाडे, दात आणि डोळ्यांसाठी सुद्धा हिरवी मिरचीतील व्हिटॅमिन सी उपयुक्त ठरते.8 / 10एखादी जखम झाल्यास आणि त्यातून खूप रक्तस्त्राव होत असल्यास तिखट पदार्थ किंवा हिरव्या मिरच्यांचं सेवन करणं फायद्याचं ठरतं. हिरव्या मिरच्यांमध्ये व्हिटामिन के चं प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तस्त्राव थांबवण्यास त्याची मदत होते.9 / 10असं करा मिरचीच्या पाण्याचं सेवन- मिरचीच्या पाण्याचं सेवन करण्यासाठी रात्री मिरची कापून पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उठल्यानंतर काहीही खाण्या किंवा पिण्याआधीच या पाण्याचं सेवन करा. 10 / 10असं करा मिरचीच्या पाण्याचं सेवन- मिरचीच्या पाण्याचं सेवन करण्यासाठी रात्री मिरची कापून पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उठल्यानंतर काहीही खाण्या किंवा पिण्याआधीच या पाण्याचं सेवन करा. आणखी वाचा Subscribe to Notifications