The most expensive and incredible fruits in the world
जगातील महागडी पण विचित्र फळं, चौकोनी कलिंगड अन् लाफिंग बुद्धाच्या आकाराचा नासपती By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 02:08 PM2018-04-13T14:08:42+5:302018-04-13T15:16:01+5:30Join usJoin usNext भारतात भाज्यांमध्ये आणि फळांमध्ये वेगवेगळे प्रकार सहजरित्या उपलब्ध असतात. पण तुम्ही कधी ३००० डॉलर्सचा आंबा किंवा चौकोनी आकाराचा कलिंगड पाहिलाय का? नाही ना? असेच काही जगभरातील फळांचे विविध प्रकार व त्यांचे दर पाहून तुम्हालाही विश्वास ठेवणं अशक्य होईल. १) नासपती बुद्धा – चायनामध्ये मिळणाऱ्या या नासपती फळाचा आकार विशिष्ट प्रकारच्या साच्यामध्ये पिकवल्यामुळे लाफिंग बुद्धासारखा दिसतो. या फळाची किंमत प्रत्येकी ८ डॉलर इतकी आहे. २) सेकाई इची सफारचंद – जगातले आकाराने सर्वात मोठे व सर्वात महागडे सफरचंद म्हणून सेकाई फळ ओळखले जाते. या सेकाई सफरचंदची किंमत २१ डॉलर्स इतकी आहे. ३) जपानी आंबा – जपानी आंबा हा जगातील सर्वात महागडा आंबा आहे. आकाराने मोठा व किंमतीनेही तितक्याच मोठ्या अशा या आंब्याची किंमत प्रत्येकी ३००० डॉलर्स इतकी आहे. ४) अननस – या फळाचा आकार साधारण दिसत असला तरी इंग्लडमधील लॉस्ट गार्डन इथे पिकणाऱ्या या एका अननसाची किंमत १५००० इतकी आहे. ५) डेकोपॉन संत्री – जगातली चवीला सर्वात गोड समजली जाणारी संत्री म्हणून ही संत्री ओळखली जातात. आकाराने मोठ्या या संत्री अनुकूल वातावरणाअभावी पिकवणं कठिण असतं.टॅग्स :अन्नआंतरराष्ट्रीयजपानfoodInternationalJapan