Pizza is better breakfast than cereals claims a US dietitian
नाश्त्यासाठी पिझ्झा खाणं आरोग्यासाठी फायदेशीर?; एक्सपर्ट्सचा दावा By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 12:09 PM1 / 8सकाळचा नाश्ता आपल्या दिवसभर एनर्जी देण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. त्यामुळे नाश्त्यामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे, याबाबत विचार करणं आवश्यक ठरतं. एवढचं नाहीतर सकाळचा नाश्ता रात्रीच्या जेवणात राहिलेली न्यूट्रिशन्सची कमतरता पूर्ण करण्यासाठी मदत करतो. नाश्त्यासाठी अनेक आहारतज्ज्ञ तेलकट नसलेले आणि जास्त न्यूट्रिशन्स असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. जसं इडली, पोहे, सीरियल्स (धान्य) या पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देण्यात येतो. पण काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार, एका अमेरिकन डाएटीशनने असा दावा केला आहे की, नाश्त्यामध्ये धान्यांऐवजी पिझ्झा खाणं अत्यंत फायदेशीर ठरतं. जाणून घेऊया नक्की काय आहे हे प्रकरण?2 / 8एका अमेरिकेतील आहारतज्ज्ञांनी असा दावा केला आहे की, ब्रेकफास्टमध्ये पिझ्झा खाणं हा धान्य किंवा इतर पदार्थांपेक्षा बेस्ट ऑप्शन आहे. अनेक लोक सकाळच्या वेळी पिझ्झा खातात. परंतु, आहारतज्ज्ञ चेल्सी यांनी सांगितल्यानुसार, हा दिवसाची सुरुवात करण्यासाठी उत्तम उपाय आहे. 3 / 8न्यूयॉर्क बेस्ड चेल्सी यांनी एका न्यूज पोर्टलमध्ये सांगितले की, अनेक धान्यांमध्ये साखरेचे अधिक प्रमाण आढळते. त्यामुळे त्यांच्याऐवजी पिझ्झा हा उत्तम पर्याय आहे. नवभारत टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, चेल्सी सांगतात की, प्लेन चीज पिझ्झाच्या एका स्लाइसमध्ये कार्बोहाइड्रेट, प्रोटीन आणि फॅट्स यांचा समावेश असतो. 4 / 8चेल्सी यांनी सांगितल्यानुसार, साखर असणाऱ्या धान्यांमध्ये आणि लो फॅट दूधामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. एवडचं नाहीतर कार्बोहायड्रेट्सही मोठ्या प्रमाणावर असतात. पम चेल्सी असं कुठेच म्हणत नाही की, दररोज कॉफीसोबत पिझ्झा खाणं अत्यंत फायदेशीर ठरतं. 5 / 8चेल्सी यांचं म्हणणं आहे की, जर तुम्हाला धान्य आणि पिझ्झा यांपैकी एकाच पदार्थांची निवड करायची असेल तर पिझ्झा उत्तम पर्याय आहे. यामागे चेल्सी यांचा तर्क आहे की, नाश्त्यामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहाइड्रेट, हेल्दी फॅट्स आणि प्रोटीनचं हेल्दी कॉम्बिनेश असणं आवश्यक आहे. कारण सकाळचाय नाश्ता तुमच्या दिवसाची सुरुवात करण्यासोबतच दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठीही मदत करतो. 6 / 8तुम्ही व्होल ग्रेन टोस्टसोबत पालक एकत्र करून खाऊ शकता किंवा यॉगर्टमध्ये फ्रुट्स, नट्स आणि सीड्स एकत्र करून खाऊ शकता. जर तुम्ही धान्यांचा समावेश करत असाल तर शुगर कॉन्टेंट लक्षात घ्या. जास्त शुगर कॉन्टेंटमुळे गंभीर समस्या होऊ शकतात. 7 / 8चेल्सी यांनी सांगितल्यानुसार, रात्री उरलेले शिळ्या पदार्थांमध्ये जर मुबलक प्रमाणात भाज्या असतील तर सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही समावेश करू शकता. 8 / 8(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.) आणखी वाचा Subscribe to Notifications