हिवाळ्यात खा हे 10 सुपरफूड्स; आरोग्य राखण्यासोबतच सर्दी-खोकला होईल दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 02:37 PM2019-11-01T14:37:09+5:302019-11-01T14:47:08+5:30

थंडीत वातावरणातील गारवा वाढतो त्यावेळी थंडीपासून रक्षण करण्यासाठी आपण गरम कपड्यांचा वापर करतो. पण तरिदेखील सर्दी-खोकला, श्वसनाचे विकार आणि हृदयविकारांचा धोका बळावतो. थंडीत शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी होते. आज आम्ही तुम्हाला काही अशा पदार्थांबाबत सांगणार आहोत. ज्यांचा डाएटमध्ये समावेश केल्याने हिवाळ्यातही आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते.

दररोज अनोशापोटी 1 ते 2 लसणाच्या पाकळ्या खा. तसेच जेवणातही लसणाचा समावेश करा. यामध्ये असलेले अॅन्टी-ऑक्सिडंट शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवतात आणि इन्फेक्शनचा धोका कमी होतो.

संत्री, अननस, पेरू, द्राक्षं यांसारख्या आंबट फळांचा आपल्या डाएटमध्ये समावेश करा. यामध्ये आढळून येणारं व्हिटॅमिन-सी थंडीत होणारा खोकला, सर्दी यांसारख्या इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी मदत करतो.

सकाळी किंवा संध्याकाळी भूक लागल्यानंतर एक उकडलेलं रताळं खा. रताळ्यातील पोषक तत्न आजारांपासून बचाव करण्यासाठी मदत करतात. यामध्ये चिमुटभर दालचिनी एकत्र करा.

दह्यामध्ये हेल्दी बॅक्टेरियासोबत कॅल्शिअम, झिंक यांसारखी अनेक पोषक तत्व आणि मिनरल्स असतात. जे शरीरातील आजारांचा धोका 20 टक्क्यांनी कमी करतात. त्यामुळे आपल्या डाएटमध्ये दररोज एक वाटी दह्याचा नक्की समावेश करा.

नाश्त्यामध्ये ओट्सचा समावेश केल्याने शरीरात अॅन्टी-ऑक्सिडंट, अॅन्टी-बायोटिक आणि अॅन्टी-मायक्रोबियलचे प्रमाण राखण्यास मदत होते. त्यामुळे शरीराचं रोगांपासून बचाव होतो.

ब्रोकलीमध्ये असलेलं व्हिटॅमिन सी आणि कॅल्शिअम शरीराती रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करते. तसेच हाडांच्या मजबुतीसाठीही ब्रोकली मदत करते.

आयुर्वेदात आल्याच्या औषधी गुणधर्मांबाबत सांगितलं आहे. आलं सर्दी-खोकला, श्वसनाचे विकार दूर करण्यासाठी मदत करतं. तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कंट्रोलमध्ये राहण्यासाठीही मदत करतो. आल्याचा चहा तयार करून तुम्ही त्याचं सेवन करू शकता. तसेच जेवण तयार करतानाही आल्याचा वापर करू शकता.

आठवड्यातून 2 ते 3 वेळा पालकची भाजी किंवा ज्यूस डाएटमध्ये समावेश करा. शरीरात अॅन्टी-ऑक्सिडंट, व्हिटॅमिन-सी आणि बिटा कॅराटिन योग्य प्रमाणात राहतं. ज्यामुळे आजार बळावण्याचा आजार कमी होतो.

दररोज सकाळी 2 पाण्यात भिजवलेले बदाम खाल्याने शरीरात व्हिटॅमिन ईची कमतरता होत नाही.

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)