Weird food combinations that will shock your taste
अशा विचित्र पदार्थांची चव तुम्ही कधी चाखली आहे का? By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 3:47 PM1 / 13पदार्थांची चव वाढविण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयोग करत असतात. यामध्ये काही प्रयोग यशस्वी होतात पण काही एवढे विचित्र होतात की, अगदी नको वाटतं. नवीन ट्राय करण्याच्या नादात काही लोक त्या पदार्थांचं पूर्ण रूप पालटून टाकतात. अशातच काही चित्र-विचित्र फूड कॉम्बिनेशन्सबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यांची चव चाखण्याचा विचार तुम्ही कदाचित स्वप्नातही करू शकणार नाही. 2 / 13कढी-भात ऐकलं असेल पण कधी कढी आणि नूडल्स ऐकलं आहे का? विचित्र वाटलं ना ऐकून. पण काही लोक स्पायसी न्यूडल्ससोबत कढी खाणं पसंत करतात. 3 / 13दोन्ही पदार्थ फार टेस्टी आहेत पण वेगवेगळे. एकत्र खाणं कदाचितच कोणाला तरी आवडेल. 4 / 13Nutella म्हटलं की, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. पण तुम्ही Nutella Dosa खाणं पसंत कराल का? अनेकांना हा पदार्थ आवडतो. 5 / 13पिझ्झा वेगवेगळ्या पद्धतींनी तयार केला जातो. परंतु, पिझ्झा आणि मध एकत्र खाण्याचा विचार तुम्ही करू शकता का? कदाचित तुम्हाला ऐकून विचित्र वाटले पण अनेक लोक हे खाणं पसंत करतात. 6 / 13लोणच्यासोबत भात खाणं ठिक आहे. पण तुम्ही कधी Ketchup सोबत भात खाल्ला आहे का? 7 / 13आंबा आपल्या सर्वांनाच आवडतो. पण तुम्ही हा लाल मिरचीसोबत खाणार का? 8 / 13चॉकलेट आणि चिप्स एकत्र खाणं थोडं विचित्र वाटत असलं तरिही अनेक लोक हे दोन्ही पदार्थ एकत्र खातात. त्यामुळे काही नवीन ट्राय करायचं असेल तर एकदा नक्की ट्राय करू पाहा.9 / 13आपल्यापैकी बरेचजण चहासोबत बिस्किट्स खातात पण काहीजण पाण्यासोबतही बिस्किट्स खातात. चॉकलेट क्रिम बिस्किट आणि ऑरेंज ज्यूस फारच विचित्र आहे. 10 / 13चॉकलेट गोड असते तर मिरची तिखट. पण हे दोन्ही पदार्थ एकत्र खाणं म्हणजे, थोडसं विचित्रच नाही का? 11 / 13बटर, चीझ पॉपकॉर्न तुम्ही खाल्ले असतील पण कधी पॉपकॉर्न आणि केचअप एकत्र खाल्लं आहे का? ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण काही लोक फार आवडीने हे खातात. 12 / 13पीनट बटरचं सॅन्डविच तुम्ही ऐकलं असेल पण पीनट बटर आणि आंबा असं काही ऐकलं आहे का? ऐकायलाच एवढं विचित्र वाटतंय तर चवीला कसं असेल याचा विचारही करवत नाही.13 / 13आता तर हद्दचं झाली बाई... पॉपकॉर्न आणि आइस्क्रिम एकत्र खाणं कसं शक्य आहे? आणखी वाचा Subscribe to Notifications