Stunning Wanda Nara reveals she puts ‘sexy’ naked snaps on Instagram to cheer her fans
Shocking : 'त्या' फॉलोअर्संना खूश करण्यासाठी फुटबॉलपटूची पत्नी पोस्ट करते न्यूड फोटो! By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 12:48 PM2020-02-25T12:48:18+5:302020-02-25T12:56:03+5:30Join usJoin usNext अर्जेटिनाची मीडिया पर्सनॅलिटी, फुटबॉल एजंट, मॉडेल, टीव्ही अँकर अशा अनेक भूमिकांमध्ये दिसलेल्या वँडा नारानं धक्कादायक खुलासा केला. सोशल मीडियावर वँडा नाराचे 6.2 मिलियन म्हणजेच 62 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. वँडा नारा ही अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू मौरो इकार्डीची पत्नी आहे. पण, याही पलिकडे तिनं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिनं नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. सोशल मीडियावरील आपल्या दुःखी चाहत्यांना खूश करण्यासाठी जाणीवपूर्वक न्यूड फोटो पोस्ट करत असल्याचा गौप्यस्फोट वँडानं केला. अर्जेंटियन फुटबॉलपटूच्या या धक्कादायक विधानानंतर सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सची संख्या वाढली आहे. तिने सांगितले की,''मी आज तुम्हाला सत्य सांगते. क्वांटिटीपेक्षा माझा भर क्वालिटीवर असतो.'' ती पुढे म्हणाली,'' माझ्या सेक्सी फोटोमुळे लाखो फॉलोअर्सना आनंद मिळतो. विशेष म्हणजे जेव्हा ते दुःखी असतात, तेव्हा माझे न्यूड फोटो त्यांना तणावमुक्त करतात.'' न्यूड फोटो पोस्ट केल्यानंतर मिळणाऱ्या आनंदाचा अनुभव अनेक फोलोअर्सनी शेअर केल्याचा दावाही वँडानं केला आहे. तिनं जांभळ्या रंगाच्या बिकनी घातलेल्या फोटोला सर्वाधिक लाईक्स मिळाले होते. पण, नव्या फोटोत तिनं पूर्णपणे विवस्त्र होण्याचा निर्णय घेतला आणि तो पोस्टही केला. रोमच्या बॅग्लिओनी हॉटेलच्या लिफ्टमध्ये तिनं हा न्यूड फोटो काढला आहे. अर्जेंटिनाचा माजी फुटबॉलपटू मॅक्सी लोपेझ याच्याशी वँडाचं प्रेमसंबंध होते. 2013मध्ये या दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर वँडा आणि इकार्डी यांची जोडी जमली. इकार्डी पॅरीस सेंट जर्मेन क्लबचे प्रतिनिधित्व करतो. पीएसजीच्या पराभवानंतर इकार्डीनं सेक्स करण्यास नकार दिल्याचा दावाही वँडानं केला. टॅग्स :फुटबॉलअर्जेंटिनाइन्स्टाग्रामसोशल मीडियाFootballArgentinaInstagramSocial Media