World's expensive goalkeeper
जगातील महागडा गोलरक्षक By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 02:37 PM2018-08-09T14:37:13+5:302018-08-09T14:39:06+5:30Join usJoin usNext इंग्लिश प्रीमिअर लीगमधील क्लब चेल्सीने गुरूवारी विक्रमी किंमतीत स्पेनचा गोलरक्षक केपा अरिझाबॅलगा आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. चेल्सीने 23 वर्षीय केपासाठी 80 कोटी युरो किमत ( 6,36,54,95,408 भारतीय चलन) मोजली. अॅटलेटिको माद्रिद क्लबचा हा माजी खेळाडू जगातील सर्वात महागडा गोलरक्षक ठरला आहे. याआधी हा विक्रम ब्राझिलच्या अॅलिसन बेकरच्या नावावर होता. त्याला लिव्हरपूलने 65 कोटी युरो ( 5,72,90,43,046.35 भारतीय चलन) या किमतीत लिव्हरपूलने करारबद्ध केले होते. ब्राझिलचाच एडरसन 2017 मध्ये मँचेस्टर सिटी क्लबशी करारबद्ध झाला. त्याला 35 कोटी युरोत ( 3,08,52,61,278.75 भारतीय चलन) करारबद्ध करण्यात आला. जगातील अव्वल दहा महागड्या गोलरक्षकांमध्ये गीगी बफन, मॅन्युयल नॉयर आणि डेव्हिड डी जी यांचाही क्रमांक येतो. या तिघांना अनुक्रमे युव्हेंटस, बायर्न म्युनिच आणि मँचेस्टर युनायटेड यांनी करारबद्ध केले. केपाने स्पेनच्या सर्व वयोगटातील संघांचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्याने 19 वर्षांखालील युरोपियन अजिंक्यपद स्पर्धेतही स्पेनचे प्रतिनिधीत्व केले होते. नोव्हेंबरमध्ये कोस्टा रिकाविरूद्धच्या मैत्रीपूर्ण लढतीत त्याने स्पेनच्या वरिष्ठ संघाकडून पदार्पण केले होते.टॅग्स :फुटबॉलक्रीडाFootballSports