शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'हे' दहा फंडे आजमावा आणि नेहमी हेल्दी आणि फिट राहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2019 6:57 PM

1 / 11
आपल्याला अनेकदा हेल्थ इज वेल्थ असं सांगण्यात येतं. परंतु सध्याची धावपळीची जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठीही वेळ नसतो. अशातच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काही असे 10 फंडे, जे तुम्ही प्रत्येक दिवशी फॉलो करून आजारांना दूर ठेवू शकता.
2 / 11
नाश्त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. सकाळी उठल्यानंतर 2 तासांच्या आतमध्ये नाश्ता करणं गरजेचं आहे. नाश्ता तुम्ही पोटभर करू शकता. कारण हे सकाळचं पहिलं जेवण आहे.
3 / 11
प्रत्येक 2 ते 3 तासांनी काहीना काही खा. मग ते बिस्किट्स खा, 4 ते 5 बदाम खा किंवा एखादं केळं खा. फक्त लक्षात ठेवा की, लहान मील फ्राइड किंवा गोड नसावं.
4 / 11
कधी 12 वाजता दिवसा तर कधी 4 वाजता संध्याकाळी असा नाश्ता करू नका. नाश्त्याची वेळ ठरवून घ्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, चपाती आणि तांदूळ एकत्र करा. एका वेळ चपाती खा किंवा भात खा.
5 / 11
आपल्या डाएटमध्ये तळलेले, भाजलेले किंवा गोड पदार्थ खाणं टाळा. त्यामुळे 3 महिन्यांमध्ये 4 ते 5 किलो वजन कमी होण्यास मदत होईल. त्यासाठी एक्सरसाइज करण्याची गरज भासणार नाही.
6 / 11
नेहमी फिट राहण्यासाठी आठवड्यातून कमीत कमी 4 वेळा सकाळी 15 मिनिटांसाठी एक्सरसाइज करणं गरजेचं असतं. जर हे शक्य नसेल तर निदान 15 मिनिटासाठी ब्रिस्क वॉक करा. लक्षात ठेवा की, वॉक करण्यासाठी जाताना आणि परत येताना लिफ्टचा वापर करू नका.
7 / 11
मैदा खाऊ नका. बटर नान खाण्याऐवजी रोटी खा. मैद्यापासून तयार करण्यात आलेला कोणत्याही पदार्थाचा डाएटमध्ये समावेश करू नका. कारण मैदा शरीरासाठी अत्यंत घातक ठरतो.
8 / 11
जेवणाची सुरुवात सलाडने करा. त्यानंतर जेव्हा भूक असेल, तेव्हा जंक फूडऐवजी हेल्दी पदार्थ खा. जेवणानंतर अर्ध्या तासाने एक ग्लास ताक प्या.
9 / 11
रात्रीचं जेवणात पचण्यास हलक्या पदार्थांचा समावेश करा. रात्री दोन चपात्यांपेक्षा जास्त खाऊ नका. शक्य झाल्यास 8 वाजण्यापूर्वीच रात्रीचं जेवण करा.
10 / 11
असं होऊ शकतं की, दररोज जिममध्ये जाणं तुम्हाला वेळाचा दुरूपयोग वाटू शकतो. परंतु हा तुमचा गैरसमज आहे. परंतु गरजेचं नाही की, तुम्ही जिममध्येच एक्सरसाइज करा.
11 / 11
टिप : वरील गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.
टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहार