Avoid these 5 fruits to control sugar level who have high diabetes health tips
डायबेटिस असेल तर 'या' फळांपासून जरा जपून... झटक्यात वाढते 'शुगर' By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 04:28 PM2023-08-28T16:28:23+5:302023-08-28T16:44:55+5:30Join usJoin usNext फळं खाणं चांगली सवय असली तरी मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी याकडे लक्ष द्यायला हवंFruits To Avoid in Diabetes: फळं खाणं ही एक चांगली सवय मानली जाते. फळांमुळे शरीर कायम हायड्रेटेड राहते. पण तुम्हाला जर मधुमेहाचा त्रास असेल तर मात्र तुम्ही ही ५ फळं खाणं नक्कीच टाळायला हवीत.केळी- हे लोकप्रिय फळ आहे. ते बऱ्याच अर्थी फायदेशीर मानले जाते. त्यात फायबर, प्रथिने, जीवनसत्त्वे, मॅंगनीज, पोटॅशियम असे अनेक पोषक घटक मिळतात. पण NCBI च्या अभ्यासानुसार पिकलेली केळी खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते कारण त्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते.कलिंगड- हायड्रेशनसाठी उन्हाळ्यात कलिंगड खावे असे कायम म्हटले जाते. पण एकाच वेळी जास्त कलिंगड खाऊ नये. कलिंगडामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, जे मधुमेहींसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते.अननस- मधुमेही रुग्णांनी अननस कमी प्रमाणात खावे. व्हिटॅमिन सी असलेले अननस फळ जास्त प्रमाणात खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते. त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. जे रक्तात लवकर विरघळते आणि ग्लुकोज वाढवते.वाळलेले खजूर- खजुरामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. तशातच जर हे खजूर वाळवून घेतले तर ते प्रमाण आणखी वाढते. म्हणूनच मधुमेहामध्ये हे अजिबात खाऊ नये.आंबा- फळांचा राजा आंबा हे मधुमेहाच्या रुग्णांसाठीही उत्तम फळ नाही. त्यात नैसर्गिकरित्या साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ते अतिशय जपून खावे.टॅग्स :मधुमेहफळेहेल्थ टिप्सdiabetesfruitsHealth Tips