Ayurveda best home remedies get rid of white hair in small age
कमी वयात पांढरे झालेले केस काळे करण्याचे बेस्ट घरगुती उपाय, एकदा कराच! By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2023 1:11 PM1 / 9अलिकडे सध्याची बदलती लाइफस्टाईल आणि चुकीचा आहार व सवयींमुळे अनेकांना कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या होत आहे. अशात तुम्हाला चारचौघात लाजिरवाण्या क्षणांचा सामना करावा लागतो. बरेच लोक कलरचा वापर करतात. पण त्याने जास्त काळ फायदा होत नाही. अशात पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही घरगुती आयुर्वेदिक उपाय घेऊन आलो आहोत.2 / 9कोरफड - पांढरे केस काळे करण्यासाठी कोरफड फार चांगला उपाय आहे. केसांना कोरफडीचा गर लावल्यानेही केस गळणे आणि पांढरे होणे बंद होतात. यासाठी कोरफडीच्या गरामध्ये लिंबाचा रस टाकून पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट केसांना लावा. काही दिवस हा उपाय करून बघा.3 / 9कांदे - कांदा फक्त तुमच्या जेवणाची चव वाढवण्यासाठी नाही तर तुमचे केस काळे करण्यासाठीही मदत करतो. काही दिवस आंघोळ करण्याआधी केसांना कांद्याची पेस्ट किंवा रस लावा. याने पांढरे केस काळे होऊ लागतील. तसेच केसांना चमकही येईल.4 / 9आवळा - आवळा आरोग्यासाठी वेगवेगळ्या दृष्टीने फायदेशीर आहे. आयुर्वेदात याचे अनेक फायदे सांगितले आहेत. आवळ्याचं नियमीत सेवन केल्याने तुमची पांढऱ्या केसांची समस्याही दूर होऊ शकते. यासाठी आवळा केवळ खाऊ नका तर हा मेहंदीमध्ये मिश्रित करूनही केसांना लावा. तसेच आवळा बारीक करुन गरम खोबऱ्याच्या तेलात मिश्रित करा. हे तेल रोज केसांना लावा, यानेही समस्या दूर होईल.5 / 9कढीपत्ता - पांढरे होत असलेल्या केसांसाठी कडीपत्ता फार चांगला मानला जातो. आंघोळीच्या पाण्यात कढीपत्त्याची काही पाने टाका आणि एक तासांनी त्या पाण्याने केस धुवावे किंवा कढीपत्त्याची पाने बारीक करुन गरम खोबऱ्याच्या तेलात टाका. हे तेल केसांना लावा. यानेही फायदा होतो.6 / 9काळे मिरे - काळे मिरे हे वेगवेगळ्या पदार्थांमध्ये चवीचं काम तर करतच सोबतच याने पांढरे केस काळेही होतात. यासाठी काळे मिरे पाण्यात उकडून घ्या आणि त्या पाण्याने केस धुवा. काही वेळा हा उपाय केल्यास पांढरे केस काळे होतील.7 / 9कॉफी आणि काळा चहा - जर तुम्हाला पांढऱ्या होणाऱ्या केसांची समस्या भेडसावत असेल तर काळा चहा आणि कॉफीची मदत घेऊ शकता. पांढरे झालेले केस जर तुम्ही काळ्या चहाच्या किंवा कॉफीच्या अर्काने धुवाल तर पांढरे केस पुन्हा काळे होऊ लागतील. हा उपाय किमान दोन ते तीन वेळा करावा.8 / 9दही - पांढरे केस काळे करण्यासाठी तुम्ही दह्याचाही वापर करु शकता. यासाठी हिना आणि दही समान प्रमाणात मिश्रित करुन पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांना लावा. हा घरगुती आठवड्यातून एकदा केल्यास केस काळे होऊ शकतात.9 / 9भृंगराज आणि अश्वगंधा - भृंगराज आणि अश्वगंधाची मूळं केसांसाठी वरदान मानले जातात. याची पेस्ट तयार करुन त्यात खोबऱ्याचं तेल टाका. ही पेस्ट काही तासांसाठी केसांच्या मुळात लावा. नंतर केस कोमट पाण्याने चांगले स्वच्छ करुन घ्यावे. यानेही केस काळे होतात. आणखी वाचा Subscribe to Notifications