शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पिवळे दात पांढरे अन् चमकदार करण्याचे बेस्ट आयुर्वेदिक उपाय, एकदा कराच!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2023 1:23 PM

1 / 8
Yellow Teeth : बरेच लोक तोंडाच्या आरोग्याकडे फार दुर्लक्ष करतात. पण असं केलं नाही तर दातांसंबंधी अनेक गंभीर समस्या होऊ शकतात.
2 / 8
जास्तीत जास्त लोकांना दात पिवळे होणे, हिरड्यांमध्ये वेदना, दात दुखणे, पायरिया, किड लागणे, तोंडातून दुर्गंधी येणे आणि दात कमजोर होणे अशा समस्या होतात. अशात डॉक्टरांनी काही आयुर्वेदिक जडीबुटींच्या मदतीने दात चमकदार आणि निरोगी ठेवण्याच्या टिप्स दिल्या आहेत.
3 / 8
आंबे आणि पेरूची पाने - आंबे आणि पेरूची पाने दातांवर घासल्याने ते पांढरे होण्यास मदत मिळते. ही हिरवी पाने इनेमल क्लीनरच्या रूपात काम करतात. यासाठी तुम्हाला लसूण, सैंधव मीठ, पेरू आणि आंब्याची पाने बारीक करून पावडर बनवा. हे पावडर रोज दातांवर घासा. याने हिरड्याही मजबूत होतात.
4 / 8
बाभळीच्या फांद्या आणि पाने - दात पांढरे करण्यासाठी आणि दातांची समस्या दूर करण्यासाठी बाभळी एक शक्तीशाली जडीबुटी आहे. या जडीबुटीमध्ये अॅंटी- मायक्रोबियल गुण असतात. बाभळीची पाने किंवा फांद्या चावल्याने अॅंटी-बॅक्टेरिअल एजंट रिलीज होतात. बाभळीच्या कोवळ्या फांद्यांचा टूथब्रशसारखा वापर करू शकता. बाभळीमध्ये आढळणारं टॅनिन दात चमकदार करतं.
5 / 8
वडाची फांदी - वडाच्या कोवळ्या फांदीचा तुम्ही टूथब्रशसारखा वापर करू शकता. या फांदीने दात घासले तर खूप फायदा होतो. याने दात केवळ चमकदारच नाही तर दात आणि हिरड्यांचं आरोग्यही चांगलं राहतं.
6 / 8
कडूलिंब - दातांचा पिवळेपणा घालवायचा असेल आणि दात चमकदार करायचे असतील तर कडूलिंबाचं झाड एक बेस्ट उपाय आहे. कडूलिंबाच्या फांद्यांचा वापर आजही भारतात टूथब्रश म्हणून वापर करतात. कडूलिंबाच्या तेलामध्ये अॅंटी-सेप्टिक गुण असतात. ज्यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते. दातांमधील कीटाणू दूर होतात आणि दातांना किड लागण्याची समस्या दूर होते.
7 / 8
त्रिफळा - दात पांढरे करण्यासाठी आणि तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी त्रिफळा फायदेशीर मानला जातो. याने तोंडातील फोडही दूर होतात. यासाठी त्रिफळा पाण्यात उकडून घ्या, हे पाणी जरा घट्ट झालं पाहिजे. ते थंड झाल्यावर या पाण्याने गुरळा करा.
8 / 8
तुळशी - तुळशीची काही पाने वाळवा, त्यांचं पावडर तयार करा आणि हे पावडर बोटाने दातांवर घासा. तुळशीच्या पानांमुळे दातांची चांगली स्वच्छता होते आणि दात चमकदार होतात. याने पायरिया म्हणजे हिरड्यातून रक्त येण्यासारखी समस्या दूर होते.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य