शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शुगर, बिपी कंट्रोल कसे करावे? सीताफळ ठरेल उपयुक्त; फळ एक अन् फायदे अनेक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 4:00 PM

1 / 9
शरीर सुदृढ ठेवण्यासाठी आहाराकडे लक्ष देणे सर्वांत महत्त्वाचे आहे. खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण नसल्यामुळे अनेक प्रकारचे त्रास किंवा व्याधी जडू शकतात. आताच्या घडीला डायबिटीज आणि ब्लड प्रेशर हे आजार अगदी सामान्यपणे पाहायला मिळतात. या आजारांवर नियंत्रण मिळण्यासाठी अनेक गोष्टी सहाय्यभूत ठरू शकतात. डायबिटीज आणि ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी काही फळे उपयुक्त ठरू शकतात.
2 / 9
डायबिटीज आणि ब्लड प्रेशरचा त्रास यामुळे हृदयविकाराचा धोका असतो. या बाबतीत डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषधे सुरू करावीत. मात्र, डायबिटीज आणि ब्लड प्रेशर नियंत्रणासाठी काही घरगुती उपायही प्रभावी ठरू शकतात. अनेक आयुर्वेदिक औषधे, मसाले आणि फळे यांचा आहारात समावेश करून रक्तदाब आणि मधुमेहावर सहज नियंत्रण ठेवता येऊ शकते.
3 / 9
बाजारात अनेक प्रकारची फळे उपलब्ध असतात. काही फळे सिझनल असतात. त्या त्या सिझनमध्ये ती मिळतात. असेच एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध फळ म्हणजे सीताफळ. हिवाळा सुरू होताच सीताफळ बाजारात येण्यास सुरुवात होते. शुगर आणि बीपी नियंत्रित करण्यासोबतच सीताफळाचे अनेक फायदे आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
4 / 9
डायबिटीज आणि ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी सीताफळाचे सेवन फायदेशीर आहे. सीताफळ चवीला छान असते, तसेच ते औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असते. हे मधुमेहासाठी खूप चांगले आहे, असे म्हटले जाते.
5 / 9
सीताफळ चवीला गोड असल्यामुळे ते मधुमेहासाठी चांगले नाही, असे अनेकांना वाटते. परंतु आयुर्वेदानुसार, त्याची साल रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.
6 / 9
सीताफळमध्ये अ‍ॅनोकिन नामक घटक असतो. टाईप-2 मधुमेह असलेल्या लोकांसाठी हे फायदेशीर आहे. सीताफळ हे इंन्सुलिन क्रिया सुधारते. डायबिटीज असलेल्या रुग्णांनी आठवड्यातून फक्त १ ते २ वेळा ते खावे, असा सल्ला दिला जातो. सीताफळाच्या सालीवर प्रक्रिया करून तयार केली जाणारी पावडर नियमितपणे खाल्ली तरी चालू शकते, असेही म्हटले जाते.
7 / 9
सीताफळाची साल मधुमेहाच्या रुग्णांसाठी सर्वाधिक फायदेशीर मानली जाते. त्याची पावडर १ ग्लास पाण्यात सुमारे १० ग्रॅम घ्या. हे मिश्रण अर्धे होईपर्यंत उकळवा. ते गाळून घ्या आणि दररोज सकाळी रिकाम्या पोटी प्या.
8 / 9
सीताफळ खाण्याचे असंख्य फायदे आहेत. त्यात अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी आढळतात. हे त्वचा आणि केसांसाठी चांगले आहे. तसेच दमा आणि हृदय रोग असलेल्या रुग्णांसाठी चांगले मानले जाते. यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहते.
9 / 9
सीताफळ खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते. छातीतील जळजळ कमी होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. शिवाय अॅनिमिया दूर करण्यासाठी सीताफळ खाणे चांगले आहे, असे सांगितले जाते.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सdiabetesमधुमेहHealthआरोग्य