coronavirus antibody does not decrease soon in infection free patients says study
CoronaVirus News: ...तर ५ महिन्यांपर्यंत होणार कोरोनापासून बचाव; संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर By कुणाल गवाणकर | Published: October 30, 2020 04:27 PM2020-10-30T16:27:26+5:302020-10-30T16:30:27+5:30Join usJoin usNext देशातील कोरोना रुग्णांचा आकडा ८१ लाखांच्या जवळ पोहोचला आहे. काल देशात कोरोनाचे ४८ हजार ६४८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या तीन आठवड्यांपासून देशात आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. सप्टेंबरमध्ये कोरोनानं देशात हाहाकार माजवला होता. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. एका बाजूला नव्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना दुसऱ्या बाजूला कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत आहे. ७३ लाखांपेक्षा जास्त जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशाचा रिकव्हरी रेट ९१ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे कोरोनाचं संकट दूर होताना दिसत आहे. देशातील ७३ लाख ७३ हजार ३७५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. या व्यक्तींच्या शरीरात आता कोरोनाच्या अँटीबॉडी तयार झाल्या आहेत. कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तींच्या शरीरातील अँटीबॉडी ५ महिने कोरोना विषाणूपासून रक्षण करत असल्याची माहिती संशोधनातून समोर आली आहे. शरीरात तयार होणाऱ्या अँटीबॉडीजमुळे दुसऱ्यांदा कोरोनाची लागण होण्याचा धोका कमी होत असल्याची माहिती जर्नल ऑफ सायन्समध्ये प्रसिद्ध झाली आहे. अँटिबॉडीज शरीरातील कोरोनाचा विषाणू निष्प्रभ करतात. याबद्दलचं संशोधन अमेरिकेतल्या माऊंट सिनाई रुग्णालयात कार्यरत असलेल्या फ्लोरियन क्रेम्मर यांनी प्रसिद्ध केलं आहे. कोरोनाची लागण होऊन गेलेल्या व्यक्तीच्या शरीरातल्या अँटीबॉडीज लवकर नष्ट होत असल्याचं वृत्त आलं होतं. मात्र आमच्या संशोधनातून याच्या अगदी उलट माहिती समोर आल्याचं क्रेम्मर यांनी सांगितलं. कोरोनाची हलकी किंवा मध्यम स्वरुपाची लक्षणं आढळून आलेल्या ९० टक्के रुग्णांच्या शरीरातील अँटिबॉडीज काही महिने विषाणूला निष्प्रभ करण्यात यशस्वी ठरत असल्याची माहिती क्रेम्मर यांनी दिली.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याcorona virus