शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News: ...तर ५ महिन्यांपर्यंत होणार कोरोनापासून बचाव; संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर

By कुणाल गवाणकर | Published: October 30, 2020 4:27 PM

1 / 10
देशातील कोरोना रुग्णांचा आकडा ८१ लाखांच्या जवळ पोहोचला आहे. काल देशात कोरोनाचे ४८ हजार ६४८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.
2 / 10
गेल्या तीन आठवड्यांपासून देशात आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. सप्टेंबरमध्ये कोरोनानं देशात हाहाकार माजवला होता. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
3 / 10
एका बाजूला नव्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना दुसऱ्या बाजूला कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत आहे. ७३ लाखांपेक्षा जास्त जणांनी कोरोनावर मात केली आहे.
4 / 10
देशाचा रिकव्हरी रेट ९१ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे कोरोनाचं संकट दूर होताना दिसत आहे.
5 / 10
देशातील ७३ लाख ७३ हजार ३७५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. या व्यक्तींच्या शरीरात आता कोरोनाच्या अँटीबॉडी तयार झाल्या आहेत.
6 / 10
कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तींच्या शरीरातील अँटीबॉडी ५ महिने कोरोना विषाणूपासून रक्षण करत असल्याची माहिती संशोधनातून समोर आली आहे.
7 / 10
शरीरात तयार होणाऱ्या अँटीबॉडीजमुळे दुसऱ्यांदा कोरोनाची लागण होण्याचा धोका कमी होत असल्याची माहिती जर्नल ऑफ सायन्समध्ये प्रसिद्ध झाली आहे.
8 / 10
अँटिबॉडीज शरीरातील कोरोनाचा विषाणू निष्प्रभ करतात. याबद्दलचं संशोधन अमेरिकेतल्या माऊंट सिनाई रुग्णालयात कार्यरत असलेल्या फ्लोरियन क्रेम्मर यांनी प्रसिद्ध केलं आहे.
9 / 10
कोरोनाची लागण होऊन गेलेल्या व्यक्तीच्या शरीरातल्या अँटीबॉडीज लवकर नष्ट होत असल्याचं वृत्त आलं होतं. मात्र आमच्या संशोधनातून याच्या अगदी उलट माहिती समोर आल्याचं क्रेम्मर यांनी सांगितलं.
10 / 10
कोरोनाची हलकी किंवा मध्यम स्वरुपाची लक्षणं आढळून आलेल्या ९० टक्के रुग्णांच्या शरीरातील अँटिबॉडीज काही महिने विषाणूला निष्प्रभ करण्यात यशस्वी ठरत असल्याची माहिती क्रेम्मर यांनी दिली.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या