CoronaVirus : Corona Vaccine will be arrive within few weeks donald trumps says
कोरोनावर मात करणारी लस कधी येणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं उत्तर; म्हणाले.... By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 06:15 PM2020-09-09T18:15:44+5:302020-09-09T18:35:47+5:30Join usJoin usNext ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीकडून कोरोना लसीच्या चाचणीला स्थगिती मिळाल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना लसीबाबत सकारात्मक दावा केला आहे. कोरोनाची लस पुढील काही आठवड्यात मिळू शकते असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. दरम्यान कोरोनाच्या विरोधातील लढाईत मोठं अपयश आलं असून, लढ्याला मोठा धक्का बसला आहे. अॅस्ट्रॅजेनेका(AstraZeneca) आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी लस(Oxford covid-19 Vaccine)च्या मानवी चाचणीत सामील असलेली व्यक्ती आजारी पडल्यानंतर त्याचा प्रयोग थांबवण्यात आला आहे. अॅस्ट्रॅजेनेका व्यतिरिक्त इतर अनेक कंपन्याच्या लसीच्या अमेरिकेत चाचण्या सुरू आहेत. यात मॉडर्ना, फायजर यांचा समावेश आहे. ट्रम्प अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होत असलेल्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणूकांआधी कोरोनाची लस लॉन्च करण्याच्या विचारात आहेत. मंगळवारी नॉर्थ कॅरोलियामध्ये एका कॅम्पेन रॅलीदरम्यान टॅम्प यांना लस कधी येणार असं विचारण्यात आलं त्यावर ट्रम्प म्हणाले की, काही आठड्यानंतर लस उपलब्ध होईल. निवडणूकांच्या आधी लस नाही आली तर २०२० संपण्याआधी लस नक्कीच तयार होईल असं ट्रम्प यांनी अनेकदा सांगितलं आहे. अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत ६५ लाख १४ हजार लोकांना कोरोना संक्रमणाचा सामना करावा लागला आहे. आतापर्यंत १ लाख ९४ हजार लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. टॅग्स :कोरोना वायरस बातम्याआरोग्यअमेरिकाडोनाल्ड ट्रम्पcorona virusHealthAmericaDonald Trump