CoronaVirus News : टक्कल असलेल्या पुरुषांना कोरोनाचा सर्वाधिक धोका; वेळीच व्हा सावध By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 12:12 PM 2020-06-06T12:12:08+5:30 2020-06-06T12:20:35+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनासंदर्भात रिसर्चमधून वेगवेगळी माहिती समोर येत आहे. याच दरम्यान टक्कल असलेल्या पुरुषांना इतरांपेक्षा कोरोना व्हायरस संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो असा दावा करण्यात आला आहे. जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. चिंता वाढवणारी आकडेवारी सातत्याने समोर येत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 68 लाखांवर गेली आहे.
भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.
देशात धोका वाढला असून कोरोनाच्या आकडेवारीने आतापर्यंतचा नव्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे.
भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 236657 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 6642 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कोरोनासंदर्भात रिसर्चमधून वेगवेगळी माहिती समोर येत आहे. याच दरम्यान टक्कल असलेल्या पुरुषांना इतरांपेक्षा कोरोना व्हायरस संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो असा दावा करण्यात आला आहे.
टक्कल असलेल्या पुरुषांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याची माहिती एका रिसर्चमधून समोर आली आहे. अमेरिकेच्या ब्राउन युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी याबाबत दावा केला आहे.
संशोधक प्रोफेसर कार्लोस वॅम्बीयर यांनी पुरुषांमधील टक्कल हे कोविड-19 च्या गंभीर संसर्गासाठी धोकादायक घटक असल्याचं म्हटलं आहे.
टक्कल असलेल्या कोरोनाग्रस्तांचा अभ्यास केला गेला. यामध्ये कोरोनामुळं मृत्यू होण्याचा धोका स्त्रियांपेक्षा पुरुषांपेक्षा जास्त असल्याचं दिसून आलं आहे.
41 कोरोना रूग्णांवरील संशोधनात असे दिसून आलं आहे की त्यापैकी 71 टक्क्यांहून अधिक पुरुषांना टक्कल होते. स्पेनच्या एका रुग्णालयात हा रिसर्च करण्यात आला.
122 कोरोना रूग्णांवर संशोधन केलं गेलं होतं, त्यातील 79 टक्के रुग्णांना टक्कल असल्याच माहिती आणखी एका रिसर्चमधून समोर आली आहे.
पुरुषांच्या सेक्स हार्मोन एंड्रोजनमुळे कोरोना विषाणूची लागण होण्याची क्षमता वाढू शकते. अशा हार्मोनमुळे पुरुषांमध्ये औषधांचा प्रभाव कमी होत आहे आणि रुग्ण गंभीर आजारी पडतात असा दावा संशोधकांनी केला आहे.
संशोधकांच्या मते टक्कल पडणं आणि कोरोनाचा संसर्ग यांच्यात एक विशेष संबंध आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.