CoronaVirus Marathi News bald men have a higher risk of corona infection
CoronaVirus News : टक्कल असलेल्या पुरुषांना कोरोनाचा सर्वाधिक धोका; वेळीच व्हा सावध By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2020 12:12 PM1 / 12जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. चिंता वाढवणारी आकडेवारी सातत्याने समोर येत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 68 लाखांवर गेली आहे.2 / 12भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. 3 / 12देशात धोका वाढला असून कोरोनाच्या आकडेवारीने आतापर्यंतचा नव्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. 4 / 12भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 236657 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 6642 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 5 / 12कोरोनासंदर्भात रिसर्चमधून वेगवेगळी माहिती समोर येत आहे. याच दरम्यान टक्कल असलेल्या पुरुषांना इतरांपेक्षा कोरोना व्हायरस संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो असा दावा करण्यात आला आहे. 6 / 12टक्कल असलेल्या पुरुषांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याची माहिती एका रिसर्चमधून समोर आली आहे. अमेरिकेच्या ब्राउन युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी याबाबत दावा केला आहे. 7 / 12संशोधक प्रोफेसर कार्लोस वॅम्बीयर यांनी पुरुषांमधील टक्कल हे कोविड-19 च्या गंभीर संसर्गासाठी धोकादायक घटक असल्याचं म्हटलं आहे. 8 / 12टक्कल असलेल्या कोरोनाग्रस्तांचा अभ्यास केला गेला. यामध्ये कोरोनामुळं मृत्यू होण्याचा धोका स्त्रियांपेक्षा पुरुषांपेक्षा जास्त असल्याचं दिसून आलं आहे.9 / 1241 कोरोना रूग्णांवरील संशोधनात असे दिसून आलं आहे की त्यापैकी 71 टक्क्यांहून अधिक पुरुषांना टक्कल होते. स्पेनच्या एका रुग्णालयात हा रिसर्च करण्यात आला. 10 / 12122 कोरोना रूग्णांवर संशोधन केलं गेलं होतं, त्यातील 79 टक्के रुग्णांना टक्कल असल्याच माहिती आणखी एका रिसर्चमधून समोर आली आहे. 11 / 12पुरुषांच्या सेक्स हार्मोन एंड्रोजनमुळे कोरोना विषाणूची लागण होण्याची क्षमता वाढू शकते. अशा हार्मोनमुळे पुरुषांमध्ये औषधांचा प्रभाव कमी होत आहे आणि रुग्ण गंभीर आजारी पडतात असा दावा संशोधकांनी केला आहे. 12 / 12संशोधकांच्या मते टक्कल पडणं आणि कोरोनाचा संसर्ग यांच्यात एक विशेष संबंध आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications