शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : 'हा' रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वात कमी धोका; रिसर्चमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 12:36 PM

1 / 12
जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांची संख्या 74 लाखांच्या वर गेली असून तब्बल चार लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.
2 / 12
देशात कोरोना रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्या 24 तासांत 9996 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 357 लोकांचा मृत्यू झाला आहे.
3 / 12
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात एकूण रूग्णांची संख्या 2 लाख 86 हजार 579 वर पोहोचली आहे. तर देशात आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 1 लाख 41 हजार 029 झाली आहे.
4 / 12
वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनावर अद्याप कोणतेही औषध उपलब्ध झालेलं नाही.
5 / 12
लस शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळवर प्रयत्न सुरू आहेत. याच दरम्यान एका रिसर्चमधून दिलासादायक माहिती समोर आली आहे.
6 / 12
O रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा धोका कमी असल्याची माहिती रिसर्चमधून समोर आलं आहे. कोरोनाचे विषाणू प्रत्येक रक्तगटात वेगवेगळे दिसून येत आहेत त्यामध्ये O रक्तगट असणाऱ्यांना धोका कमी असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.
7 / 12
जवळापास 75 हजार लोकांवर हा रिसर्च करण्यात आला. त्यामध्ये इतर कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत O रक्तगट असलेल्या लोकांना 13 ते 26 टक्के कोरोनाचं संक्रमण होण्याचा धोका कमी असतो.
8 / 12
O रक्तगट असणाऱ्या लोकांच्या तुलनेत इतर रक्तगट असलेल्या लोकांमध्ये संशोधकांना कोणताही महत्त्वपूर्ण फरक दिसला नाही.
9 / 12
O रक्तगट असणाऱ्या लोकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचं प्रमाण कमी असल्याचं आढळून आलं.
10 / 12
लोकांना विचारलेले प्रश्न आणि डेटा कलेक्शनवर सध्या आधारीत असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये O रक्तगटामधील लोकांची रुग्णालयातील संख्या कमी असल्याचंही लक्षात आलं.
11 / 12
दोन विभागांमध्ये हा रिसर्च करण्यात आला. कोरोना झालेले रुग्ण आणि कोरोना न झालेल्या लोकांवर हा रिसर्च करण्यात आला होता. त्यानुसार तज्ज्ञांनी हा दावा केला आहे.
12 / 12
O रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना कोरोना व्हायरसाचा सर्वात धोका कमी आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBlood Bankरक्तपेढीIndiaभारतDeathमृत्यूResearchसंशोधनHealthआरोग्य