शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : चिंतेत भर! कोरोनाच्या संकटात डिप्रेशन वाढलं, तरुणांमध्ये सर्वाधिक लक्षणं; रिसर्चमधून मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 1:54 PM

1 / 15
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 20 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर 42 लाखांहून अधिक लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोनामुळे अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
2 / 15
प्रगत देशही कोरोनापुढे हतबल झाले आहे. तर दुसरीकडे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाखांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे,
3 / 15
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 41,195 नवे रुग्ण आढळून आले आहेत. सर्वच जण कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. मात्र कोरोना काळात शारीरीक आणि मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होत आहे.
4 / 15
तरुणांमधील डिप्रेशनमध्ये वाढ झाली आहे. एका रिसर्चमधून हा दावा करण्यात आला आहे. नैराश्याचा सामना करण्यांमध्ये तरुणांची संख्या ही मोठी आहे. अशा परिस्थितीत नोकरी करणाऱ्या तरुणांसमोर आता दुहेरी आव्हान आहे.
5 / 15
मेडिकल जर्नल जेएएमए पीडियाट्रिक्समध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, जागतिक स्तरावर चारमधील एक तरुण डिप्रेशनच्या समस्येचा सामना करत आहे. तर पाचमधील एकामध्ये एंजायटीची लक्षणं पाहायला मिळत आहेत.
6 / 15
विद्यापीठाचे क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधनाचे प्रमुख लेखक डॉ निकोल रेसिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वात मोठी चिंता ही आहे की तरुणांमध्ये ही लक्षणे कालांतराने वाढतात.
7 / 15
कॅनडाच्या कॅलगरी विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की कोरोनाच्या काळात मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये मानसिक समस्या वाढल्या आहेत. हा अभ्यास जगभरातील 29 वेगवेगळ्या संशोधनांकडून गोळा केलेल्या डेटावर आधारित आहे. ज्यात 80,879 जणांचा समावेश आहे.
8 / 15
विद्यापीठातील क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ डॉ. शेरी मॅडिगन यांच्या मते, लहान मुलं आणि तरुण यांच्यातील मानसिक समस्यांचे एक प्रमुख कारण म्हणजे निर्बंध आणि लॉकडाऊन आहे.
9 / 15
मानसिक समस्यांपासून मुलं आणि तरुणांना दूर करण्यासाठी आपण त्वरित पावले उचलली पाहिजेत. मेटा-विश्लेषणामध्ये पूर्व आशियातील 16, युरोपमधील चार, उत्तर अमेरिकेतील सहा, मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील प्रत्येकी दोन आणि पश्चिम आशियातील दोन रिसर्चचा समावेश होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
10 / 15
भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे अमेरिका, ब्रिटनमध्ये ही भीती काही प्रमाणात खरी होताना पाहायला मिळत आहे.
11 / 15
लहान मुलांमधील कोरोना रुग्णांची संख्या ही आधीच्या तुलनेत वाढली असल्याचं समोर आलं आहे. भारतासाठी हा धोक्याचा इशारा असून प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. अमेरिकेतील अल्बामा, अरकंसास, लुसियाना आणि फ्लोरिडामध्ये 18 वर्षाखालील मुलांमधील संसर्गाचे प्रमाण वाढले आहे.
12 / 15
अरकंसासमधील लहान मुलांच्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत 50 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. सात नवजात बालके अतिदक्षता विभागात असून दोन व्हेंटिलेटवर असल्याची माहिती मिळत आहे.
13 / 15
युनिर्व्हसिटी ऑफ ब्रिस्टलचे बाल रोग तज्ज्ञ प्रा. एडम फिन्न यांनी लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. कोरोनाबाधित मुलांची संख्या वाढत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हा आजार पहिल्या दोन लाटेच्या तुलनेने वेगळा असल्याचं म्हटलं आहे.
14 / 15
इम्पिरिअल कॉलेज लंडनमधील पीडियाट्रिक इन्फेक्सियश आजार तज्ज्ञ डॉ. एलिजाबेथ व्हिक्टर यांनी अमेरिका आणि ब्रिटनमध्ये 12 वर्षावरील मुलांमध्ये संसर्गाचा दर वाढला आहे. त्यातील बहुतांशी मुलांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे मुलांच्या लसीकरणावर लक्ष देणं गरजेचं आहे असं म्हटलं आहे.
15 / 15
तज्ज्ञांनी लठ्ठ आणि मधुमेहानेग्रस्त असलेल्या मुलांसाठी हा काळ आव्हानात्मक आहे असं म्हटलं आहे. संसर्गाचे प्रमाण अचानकपणे वाढले आहे. अमेरिकेतील मुलांमध्ये पीडियाट्रिक इन्फ्लेमेटरी मल्टी सिस्टम सिंड्रोमची (पीआयएनएस) प्रकरणे वाढली आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतResearchसंशोधनHealthआरोग्य