Eating amla gooseberry in winter increases immunity, beneficial for children!
हिवाळ्यात आवळा खाल्ल्याने वाढते रोगप्रतिकार शक्ती, मुलांसाठी फायदेशीर! By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 1:59 PM1 / 6सध्या भाजी मार्केटमध्ये आंबट-गोड चवीचे फ्रेश आवळे विक्रीसाठी दिसून येत आहेत. आवळा आपल्या बहुगुणी गुणधर्मासाठी ओळखला जातो. आवळा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. तज्ज्ञ हिवाळ्यात आवळा खाण्याचा सल्ला देतात. 2 / 6अशा स्थितीत बदलत्या हवामानासोबत रोगप्रतिकारक शक्तीही बदलते. या ऋतूमध्ये सर्दी, खोकला आणि फ्लू सारख्या समस्या सामान्य होतात. अशा परिस्थितीत आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे खूप गरजेचे आहे. 3 / 6अशा परिस्थितीत थंड हंगामात स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी आपल्या आहाराची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. जेणेकरून रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि रोगांपासून संरक्षण होईल, असे तज्ज्ञ सांगतात.4 / 6आवळा हा आरोग्यासाठी अमृतासमान मानला जातो. व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, फॉस्फोरस, आयरन, कॅरोटिन आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स गुणांनी समृद्ध स्रोत असलेल्या आवळ्याचा समावेश आहारात करणे अनेक आजारांपासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरते. 5 / 6पचनक्रिया सुधारणे, प्रतिकारशक्ती वाढवणे, तसेच त्वचा व केसांसाठी फायदेशीर असणारा आवळा मधुमेह, हृदयविकार आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतो.6 / 6हिवाळ्यात हे मुलांना संसर्गापासून वाचवते आणि त्यांची रोगप्रतिकारशक्त्ती वाढवते. आजारांपासून दूर ठेवण्याचा हा देशी उपाय आहे. मुलांसाठी आवळा असा फायदेशीर आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications