शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खुशखबर! भारतात कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी 'या' औषधाला DCGI कडून परवानगी; वाचा किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 5:16 PM

1 / 8
कोरोना विषाणूंशी लढणारे सगळ्यात स्वस्त औषध तयार झाले आहे. बाजारात या कंपनीच्या औषध निर्मीतीसाठी परवानगी सुद्धा मिळाली आहे. हे औषध बाजारात आणण्यासाठी आता DGCI कडून परवानगी मिळाली आहे. या औषधाच्या एका गोळीची किंमत ५९ रुपये इतकी आहे.
2 / 8
या औषधाचे नाव फेवीटोन आहे. ब्रिटनच्या फार्मास्युटिकल कंपनीने दावा केल्याप्रमाणे हे एंटीव्हायरल औषध कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरू शकतं. हे औषध बजारात फॅवीपिरावीर नावाने प्रचलीत आहे.
3 / 8
फायनेंशियल एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार फॅवीटॉन हे २०० मिलीग्राम टॅबलेटमध्ये उपलब्ध असेल. या औषधाच्या एका टॅबलेटची किंमत ५९ रुपये इतकी असेल. यापेक्षा जास्त किमतीत हे औषध विकले जाणार नाही.
4 / 8
ब्रिन्टन फार्माचे सीएमडी राहुल कुमार दर्डा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''हे औषध देशातील प्रत्येक कोरोना रुग्णापर्यंत पोहोचायला हवं अशी आमची इच्छा आहे. प्रत्येक कोविड सेंटरमध्ये हे औषध पुरवण्यात येणार आहे. या औषधाची किंमत ही ठरलेली असून स्वस्त दरात हे औषध उपलब्ध करून दिले जाणार आहे. ''
5 / 8
कंपनीतील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या काळात या औषधाची गरज सगळ्यांनाच आहे. ज्या रुग्णांमध्ये सौम्य आणि मध्यम लक्षणं दिसून आली आहेत अशा रुग्णांसाठी हे औषध परिणामकारक ठरू शकतं.
6 / 8
भारतात फेवीपिरावीर या औषधाच्या वापराला डीसीजीआयकडून कोरोना व्हायरसच्या उपचारांसाठी आपातकालीन स्थितीत वापरण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे.
7 / 8
जपानच्या फुजी फार्माद्वारे विकसित करण्यात आलेल्या फेविपिराविरच्या वैद्यकिय परिक्षणादरम्यान चांगले परिणाम दिसून आले आहेत. सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना हे औषध देण्यात आलं होतं.
8 / 8
सिप्ला कंपनी आता कोरोना व्हायरसच्या संक्रमणानेग्रस्त असलेल्या लोकांचे उपचार करण्यासाठी या औषधाची मदत घेणार आहे.
टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य