Harmful Effects Of Soft Drinks You Must Remember
सतत सॉफ्ट ड्रिंक घेता? 'या' परिणामांसाठी तयार राहा By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 02:04 PM2019-05-03T14:04:55+5:302019-05-03T14:08:12+5:30Join usJoin usNext मधुमेहाचा धोका- शीतपेयांमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. मुलांमध्ये स्थूलत्व वाढण्याची शक्यता- मुलांना शीतपेयाची सवय लागल्यास त्याचे शरीरावर विपरित परिणाम होतात. सतत शीतपेय प्यायल्यानं स्थूलत्वाची समस्या उद्भवते. हृदयविकाराचा धोका- शीतपेयाच्या अति सेवनानं हृदयविकाराचा धोका वाढतो. सर्वसामान्यांच्या तुलनेत सतत शीतपेय पिणाऱ्यांना हृदयविकार होण्याची शक्यता 20 टक्क्यांनी जास्त असते. दातांना धोका- सॉफ्ट ड्रिंकमध्ये सोडा असतो. तो तोंडातील बॅक्टेरियांच्या संपर्कात आल्यावर त्याचं ऍसिडमध्ये रुपांतर होतं. याचा गंभीर परिणाम दातांवर होतो. अशा परिस्थितीत स्ट्रॉनं सॉफ्ट ड्रिंक पिऊन त्यानंतर ब्रश केल्यास धोका काही प्रमाणात टाळता येतो. हाडांवर परिणाम- शीतपेयांमुळे हाडांवर विपरित परिणाम होतो. हाडांचं आरोग्य बिघडतं. किडनीचे आजार- दररोज 2 ग्लास कोला प्यायल्यास किडनीचे आजार होण्याची शक्यता दुपटीनं वाढते. कर्करोगाचा धोका- शीतपेयांमधील प्रीझर्व्हेटिव्झ आणि रंगांमुळे कर्करोग होण्याचा धोका वाढतो. झोपेवर परिणाम- शीतपेयातील कॅफेनमुळे झोपेवर गंभीर परिणाम होतात. लहान मुलांच्या बाबतीत या समस्येची तीव्रता अधिक असते. टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सकर्करोगHealthHealth Tipscancer