Health benefits of sugarcane juice right from heart disease to kidney stone and weight loss
हृदय आणि किडनीसाठी फायदेशीर ठरतो उसाचा रस; जाणून घ्या फायदे By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 02:06 PM2019-04-29T14:06:12+5:302019-04-29T14:13:12+5:30Join usJoin usNext वातावरणातील उकाडा प्रचंड वाढला आहे. अशातच या उन्हापासून बचाव करण्यासाठी आणि शरीराला थंडावा देण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. यावेळी ताक, कैरीचं पन्हं आणि थंडगार उसाचा रस हे उत्तम पर्याय असतात. अशातच ऊसाचा रस या उन्हापासून रक्षण करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. उसाचा रस फक्त सन स्ट्रोपपासून बचाव करण्यासाठी नाही तर, अनेक गंभीर आजार दूर करण्यासाठीही फायदेशीर ठरतो. जाणून घेऊया उसाच्या रसाच्या आरोग्यदायी फायद्यांबाबत... (Image Credit : Pune365)यूटीआय इंफेक्शन आणि किडनी स्टोनवर उपाय म्हणून... उसाचा रस यूटीआय इन्फेक्शन दूर करण्यासाठी मदत करतो आणि किडनी स्टोनपासूनही सुटका करतो. त्याचबरोबर किडनीचं योग्य पद्धतीने फंक्शन करण्यासाठी मदत करतो. (Image Credit : aaj.tv)वजन मेनटेन करण्यासाठी आयुर्वेदानुसार, उसाच्या रसामध्ये ग्लायसीमिक इंडेक्स अत्यंत कमी असतं आणि या कारणामुळे हे बॉडि मेटाबॉलिज्म हेल्दी ठेवतं त्याचबरोबर वजन मेनटेन ठेवण्यासाठीही मदत करतो. कॅन्सरपासून बचाव आयुर्वेदानुसार, उसामध्ये फॉस्फरस, आयर्न, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम आणि पोटॅशिअमचे प्रमाण अधिक असल्यामुळे हे अल्कलाइन असतं. हाच गुणधर्म कॅन्सर दूर ठेवण्यासाठी मदत करतो, दरम्यान या अल्कलाइन नेचरमध्ये खॅन्सर सेल्स सर्वाइव करू शकत नाहीत. संशोधनानुसार, उसाचा रस प्रोस्टेट आणि ब्रेस्ट कॅन्सरमध्ये अत्यंत फायदेशीर ठरतो. सन स्ट्रोकपासून बचाव करण्यासाठी ज्या लोकांना लघवी करताना जळजळ होते, त्यांच्यासाठी ऊस अत्यंत फायदेशीर आहे. त्याचबरोबर यामुळे सन स्ट्रोकपासूनही बचाव होतो. हृदयाच्या आजारांमध्ये अत्यंत फायदेशीर उसाचा रस हृदयाचे आजार दूर करण्यासाठी मदत करतो आणि बॅड कोलेस्ट्रॉलदेखील कमी करतं पिपंल्स दूर करण्यासाठी त्वचेवर जर पिंपल्स किंवा डाग येत असतील. तर त्यावरही उसाचा रस फायदा करतो. त्यासाठी तुम्ही दररोज उसाच्या रसाचा स्क्रब म्हणून वापर करू शकता. पिंपल्ससोबतच त्वचेच्या इतर समस्याही दूर होतात. टॅग्स :पौष्टिक आहारहेल्थ टिप्सफिटनेस टिप्सHealthy Diet PlanHealth TipsFitness Tips