health Eating protein supplements to gain strength or poison In front of shocking information
ताकद मिळवण्यासाठी प्रोटिन सप्लिमेंट्स खाताय की विष? धक्कादायक माहिती समोर By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 12:39 PM1 / 10कोरोना महामारीच्या संकटानंतर लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलून गेल्या. लोक प्रोटिनयुक्त सकस आहारावर भर देऊ लागले. आहारात अधिक पोषणमूल्ये असलेले घटक वाढावे यासाठी प्रोटिन्स सप्लिमेंटसचे सेवन करू लागले.2 / 10परंतु देशात विकल्या जाणाऱ्या लोकप्रिय ३६ ब्रँडपैकी ७० टक्केहून अधिक प्रोटिन्सवर कंटेटबाबत चुकीचे लेबलिंग केले असून, १४ टक्केमध्ये घातक विषारी घटक आढळले.3 / 10प्रोटिन्स सप्लिमेंट्सबाबत केरळमधील डॉक्टरांनी केलेल्या संशोधनात ही बाब उघड झाली.4 / 1036 प्रथिने पावडरपैकी ७० टक्के नमुन्यांमध्ये वनस्पती आधारित मिश्रण आढळले. लेबलिंग चुकीचे आढळले. 5 / 1014 मिश्रणांपैकी सातमध्ये हर्बल अर्क होते. उर्वरित मिश्रणांमध्ये वाटाणा, सोया, अंडी, दूध, शेंगदाणे, आदींचे प्रथिने स्रोत आढळले. 6 / 1036 उत्पादनांपैकी नऊ उत्पादनांमध्ये ४० टक्क्यांहून कमी प्रथिनांचे प्रमाण आढळून आले, तर उर्वरित उत्पादनांमध्ये ६० टक्क्यांहून अधिक आढळले. 7 / 1025 पूरक प्रथिनांवर सामग्रीबद्दल चुकीचे लेबलिंग केले गेले होते. जाहिरात केलेल्या प्रमाणापेक्षा प्रथिनांचे प्रमाण १० ते १५ टक्के कमी होते.8 / 1036 पैकी पाच नमुने बुरशीयुक्त म्हणजे दूषित आढळले. काही नमुन्यांमध्ये हे प्रमाण १० मायक्रोग्रॅम प्रतिकिलोपेक्षा जास्त होते. 9 / 10दरम्यान, ८% नमुन्यांमध्ये कीटकनाशकांचे अंश आढळले. २० उत्पादने भारतात तयार केली, तर उर्वरित परकीय कंपन्यांनी बनवली होती. काही ब्रँड्समध्ये केल्या जात असलेल्या दाव्याच्या निम्म्या प्रमाणातही पोषक द्रव्ये आढळली नाहीत.10 / 10तर, ७०% हून अधिक प्रोटिन्सवर चुकीची माहिती आढळली. १४% आहारांमध्ये विषारी घटक दिसले. बहुतांश प्रोटिन सप्लिमेंटस् सुमार दर्जाची असून, त्यांच्या जाहिरातीत केले जाणारे दावेही फोल आहेत, असे अहवालात म्हटले आहे. गेल्या आठवड्यात हा अहवाल मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला. आणखी वाचा Subscribe to Notifications