शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

महागाई डोक्यात जातेय! आज आहे उद्या नाही, पण जीवावरही बेतू शकते, आरोग्याला मोठा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 12:41 PM

1 / 8
कोरोनामुळे जगभरातील कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. तसेच या काळात सर्व जग ठप्प झाल्यामुळे महागाई झपाट्याने वाढली. सातत्याने वाढणारी महागाई लोकांच्या मानसिक आरोग्यासाठी घातक ठरत आहे.
2 / 8
अमेरिकेतील 90 टक्के जनता महागाईमुळे चिंतेत असल्याचं नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासातून समोर आलं आहे. वाढती महागाई आणि घटणारे उत्पन्न हे मानसिक आरोग्यासाठी घातक ठरत असल्याचा निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आला आहे.
3 / 8
हेल्थलाइनच्या अहवालानुसार महागाईमुळे मोठ्या प्रमाणात लोक तणाव आणि चिंतेने ग्रासले आहेत. अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशनच्या (APA) सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे.
4 / 8
धक्कादायक बाब म्हणजे अमेरिकेतील लोक कोरोनापेक्षा महागाईमुळे जास्त तणावाखाली आहेत. अमेरिकेतील 90% लोक महागाईशी संबंधित चिंतेने त्रस्त आहेत. कोरोनामुळे लोकांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली असून त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.
5 / 8
लोकांच्या उत्पन्नाचा थेट परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो असे आत्तापर्यंत अनेक अभ्यासातून असे समोर आले आहे. याला अनेक सामाजिक कारणेही जबाबदार आहेत.
6 / 8
दीर्घकाळापर्यंत तणाव आणि चिंता यामुळे शारीरिक आणि मानसिक आजारांचा धोका अनेक पटींनी वाढतो. लोकांना जेव्हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींवरील नियंत्रण गमावल्याचे जाणवते तेव्हा ते मानसिक संकटाचे कारण बनते.
7 / 8
शारीरिक आरोग्यावरही विपरीत परिणाम दिसून येतो. आर्थिक अडचणींमुळे निराशा येते. जेव्हा लोकांचे उत्पन्न कमी होते तेव्हा त्यांच्या तणावाची पातळी वाढते. हळूहळू ते चिंता आणि नैराश्याचे कारण बनते.
8 / 8
आरोग्य आणि उत्पन्नाचा थेट संबंध आहे आणि त्याचा बहुतेक लोकांवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे असा तणाव टाळण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. समस्या गंभीर होत असल्यास तज्ञांशी संपर्क साधावा. निष्काळजीपणा महागात पडू शकतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :Healthआरोग्यInflationमहागाईHealth Tipsहेल्थ टिप्स