Women Health : मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो. प्रत्येक स्त्रीला या प्रक्रियेतून जावे लागते. या काळात महिलांना रक्तस्राव, पोटदुखी आणि मूड स्विंगचा सामना करावा लागतो. नियमीत येणारे पीरियड्स हे प्रत्येक स्त्रीचे चांगले आरोग्य दर्शवतात. त्यात थोडीही गडबड झाली, तरी त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. काही स्त्रियांना पाळी नियमीत वेळेत येते पण रक्तस्राव खूप कमी होतो. जर तुमच्यासोबतही असे घडत असेल तर, मासिक पाळी दरम्यान रक्त प्रवाह कमी होण्यामागील कारणाबद्दल आरोग्य तज्ञ प्रियांका जयस्वाल यांच्याकडून जाणून घेऊया.