शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हिवाळ्यात मधुमेहावर नियंत्रण कसे ठेवाल? 'या' ५ गोष्टी खाल्ल्याने होईल हमखास फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 4:10 PM

1 / 6
हिवाळा हा ऋतु आल्हाददायक असला तरी मधुमेहींसाठी त्रासदायक ठरू शकतो. म्हणून जर तुम्हाला तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात पुढील ५ गोष्टींचा समावेश करा.
2 / 6
पालक आणि मुळा यांसारख्या पालेभाज्या फायबर आणि आवश्यक पोषक तत्वांनी युक्त असतात. या भाज्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
3 / 6
स्ट्रॉबेरी आणि इतर बेरीच्या फळांमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतात. ते शरीराची साखरेची गरज नियंत्रिक करून रक्तातील साखरेची पातळी समतोल राखण्यास मदत करतात.
4 / 6
कोबी, ब्रोकोली किंवा तत्सम भाज्यांमध्ये कार्ब्सचे प्रमाण कमी असते तर फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत होते.
5 / 6
गाजर, मुळा, बीट किंवा रताळे यांसारख्या भाज्यांचे सेवन केल्याने हिवाळ्यात रक्तातील साखर वाढण्यापासून रोखता येते.
6 / 6
बदाम, अक्रोड आणि चिया सीड्स, काजूबिया यासारख्या सुक्यामेव्याने मधुमेह नियंत्रित होतो. हेल्दी फॅट आणि प्रोटीनने युक्त असलेल्या या गोष्टी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात.
टॅग्स :diabetesमधुमेहHealth Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planआहार योजनाHealthआरोग्य