Know the benefits of walking after dinner and daily 20 to 30 minute walk
रात्रीच्या जेवणानंतर किती वेळ चालावं आणि काय होतात फायदे? वाचाल तर लगेच सुरू कराल... By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 3:34 PM1 / 8जास्तीत जास्त लोक रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपतात. म्हणजे जेवण झाल्यावर त्यांची कोणतीही शीरीरिक हालचाल होत नाही. पण त्यांना हे माहीत नसतं की, हे त्यांच्यासाठी किती घातक असतं. जर तुम्हीही असंच करत असाल तर वेळीच सावधान व्हा. कारण रात्री जेवणानंतर लगेच झोपायला जात असाल तर लठ्ठपणासहीत अनेक आजारांचे शिकार होऊ शकता.2 / 8आयुर्वेद डॉक्टर अबरार मुल्तानी यांच्यानुसार, 'जेवणानंतर आपण फिरायला हवं. याने शरीराचा प्रत्येक अवयव आणि मांसपेशी योग्य प्रकारे काम करतात. याने ब्लड सर्कुलेशन योग्यप्रकारे होतं. टाइप २ डायबिटीसच्या रूग्णांनीही जेवण केल्यावर थोडावेळ चालावं. त्याने ब्लड शुगर कमी होते'.3 / 8हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, रात्री जेवण केल्यावर कमीत कमी २० मिनिटे चाललं पाहिजे. जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ चालू शकता. पण हे लक्षात ठेवा की, तुम्ही जेवण केल्यावर एक तासाच्या आतच चालायचं आहे.4 / 8हेल्थ एक्सपर्टनुसार, जेवण केल्यावर २० मिनिटे पायी चालाल तर लठ्ठ होण्याचा धोका कमी होतो. कारण पायी चालल्याने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि वजन कमी करण्यासाठी तुमचं मेटाबॉलिज्म योग्य असावं लागतं.5 / 8रात्री जेवण केल्यावर चालल्याने इम्यूनिटी वाढण्यास मदत मिळते. कारण याने तुमच्या इम्यून सिस्टीममधून टॉक्सिन बाहेर निघतं. पायी चालणं आपल्या अंतर्गत अवयवांसाठी चांगलं असतं.6 / 8जेवण केल्यावर काही वेळाने शरीरात ब्लड शुगर लेव्हल वाढणं सुरू होतं. जेव्हा तुम्ही रात्री जेवण केल्यावर फिरता, तेव्हा याने ब्लड शुगर नियंत्रित राहतं.7 / 8जेवण केल्यावर पायी चालल्याने तुमच्या शरीरात एंडोर्फिनला मुक्त करून तणाव कमी होतो. ज्यामुळे तुम्हाला चांगलं वाटतं.8 / 8रात्रीच्या जेवणानंतर फिरायला गेल्याने आपलं पचन तंत्र चांगलं राहतं. याने सूजन कमी होते, जुलाब होण्याचा धोका टळतो आणि पोटासंबंधी अनेक समस्यांपासून सुटका मिळते. आणखी वाचा Subscribe to Notifications