Corona Vaccine: मोठी बातमी! भारतात तयार होतेय नव‘संजीवनी’; कोरोनाविरुद्धच्या लढाईत लोकांना मिळणार 'ब्रह्मास्त्र’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 09:46 AM2021-05-24T09:46:11+5:302021-05-24T09:51:06+5:30

Corona Vaccine: भारतात सध्या कोरोनाच्या विरुद्धच्या लढाईत लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. परंतु लसींचा तुटवडा असल्याने अनेक ठिकाणी लोकांना लस उपलब्ध होत नसल्याचं दिसून येते.

संपूर्ण जग सध्या कोरोना महामारीच्या विळख्यात सापडलं आहे. अनेक देशांना कोरोनाचा फटका बसला आहे. कोरोना व्हायरसच्या लढाईत जर महत्त्वाचं योगदान आहे ते म्हणजे या रोगावरील लसीचं. लसीचा तुटवडा ही सर्वात मोठी समस्या देशासमोर आहे.

देशासमोरील समस्या दूर करण्यासाठी आणि अदृश्य शत्रूसोबत लढण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांनी कंबर कसली आहे. बंगळुरू येथील इंडियन इन्सिट्यूट ऑफ सायन्स(Indian Institute of Science) नेदेखील यावर काम करण्यास सुरूवात केली आहे. वैज्ञानिकांचा दावा आहे की, यावेळी तयार होणारी लस कोरोनाच्या दुसऱ्या व्हेरिएंट्सचा खात्मा करण्याची क्षमता ठेवणारी आहे.

IISC चे मॉलिकुलर बायोप्सिस यूनिटच्या वैज्ञानिकांनी दावा केलाय की, त्यांनी अशा अणुंचा शोध लावला आहे जे कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी खूप फायदेशीर असल्याचं सिद्ध होत आहे. जे अणू न्यूट्रलायजिंग अँन्टिबॉडीजचं प्रमाण मोठ्या क्षमतेने उत्पादन करतं.

या कोरोना लसीचा परिणाम भारतात सध्या उपलब्ध असणाऱ्या लसीच्या तुलनेत प्रचंड आहे. मॉलिकुलर बायोप्सिसचे प्रोफेसर राघवन वरदाराजन म्हणाले की, ये अणू शरीरात मोठ्या प्रमाणात न्यूट्रलायजिंग अँन्टिबॉडीज निर्माण करतात. ज्यामुळे ते धोकादायक व्हायरसची लढण्याची क्षमता ठेवतात.

उंदीर आणि सशांवर केलेल्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये या लसीचे चांगले परिणाम दिसून आले. ज्या प्राण्यांवर ही चाचणी केली त्यात कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांच्या तुलनेत ८ पटीने अँन्टिबॉडीज तयार झाल्याचं आढळून आलं आहे. अँन्टिबॉडीज कमी झाल्या तरी रोगापासून वाचवण्यासाठी सक्षम असल्याचं वैज्ञानिकांनी सांगितलं आहे.

या नव्या लसीचं वैशिष्टे म्हणजे भारताच्या अनुकूल वातावरणात ती टिकू शकते. ही गरम वॅक्सिन आहे. त्यामुळे रुम टेम्परेचरवर तिचा साठा ठेवण्यात येऊ शकतो. आता असणाऱ्या लसींचा साठा ठेवण्यासाठी खूप कमी तापमानाची गरज भासते. त्यासाठी स्पेशल कोविड लस ठेण्यासाठी शीतगृह उभारावे लागतात.

परंतु आता निर्माण होणारी लस ही कोणत्याही वातावरणाशी जुळवून घेऊ शकते. त्यामुळे इतर लसींप्रमाणे ती खराब होण्याची शक्यता नाही. एका रुमच्या टेम्परेचरवर लसीचा साठा ठेवला जाईल तेव्हा लसीकरण अभियानात त्याचा मोठा फायदा होण्याचा दावाही करण्यात आला आहे.

वैज्ञानिकांनी सांगितलं आहे की, त्यांच्याद्वारे बनवण्यात आलेली लस ही सब्यूनिट लस आहे. व्हायरसच्या भागावरील स्पाइक प्रोटीनची बाइडिंग क्षमता रिसेप्टर आणि पेशींमध्ये सर्वात जास्त आहे. याला रिसेप्टर बाइंडिंग डोमेन म्हणतात. स्पाइक प्रोटीन १७०० अमीनो अ‍ॅसिड लांब आहे. लसीमध्ये असणारे रिसेप्टर बाइडिंग डोमेन हा त्याचा एक छोटासा भाग आहे, तो २०० एमिनो अ‍ॅसिड लांब आहे.

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, सद्यस्थितीत देशात कोणत्याही लसीमध्ये कोणतीही सब्यूनिट लस नाही. आयआयएससी(IISC) गेल्या वर्षभरापासून या लसीवर कार्यरत आहे. या लसीच्या वापरावरून वैज्ञानिक प्रचंड आशावादी आहेत. परंतु क्लिनिकल चाचणी आणि ह्युमन ट्रायल यासाठी जवळपास ९-१० महिने वेळ लागू शकतो. म्हणजे आणखी काही महिन्यात भारतात ही नवीन लस उपलब्ध होण्याची आशा आहे.

अमेरिका आणि ब्राझीलनंतर आता भारतात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या तीन लाखांवर गेली आहे. भारतात कोरोनाचे सर्वाधिक बळी दुसऱ्या लाटेत गेले आहेत. गत दोन महिन्यांत ही संख्या वाढली आहे. देशात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या आता ३,००,३१२ झाली आहे

अन्य देशांच्या तुलनेत भारताचा मृत्यूदर कमी आहे. इटली २.९९ टक्के, इंग्लंड २.८७ टक्के, ब्राझील २.७९ टक्के, जर्मनी २.३९ टक्के, रशिया २.३५ टक्के, स्पेन २.१९ टक्के, फ्रान्स १.८५ टक्के, अमेरिका १.७८ टक्के, भारत १.१२ टक्के आणि तुर्कीचा मृत्यूदर ०.८८ टक्के आहे. सध्या देशात दर १०० रुग्णांमागे एका रुग्णाचा मृत्यू होत आहे. भारतात कोरोनाचे सर्वाधिक बळी दुसऱ्या लाटेत गेले आहेत.